SSC Exams : सरकारी परिक्षेत येणार नाही भाषेचा अडसर; 15 भाषांमध्ये होणार SSC भरती परीक्षा; कोणकोणत्या भाषांचा आहे समावेश?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून (SSC Exams) एक मोठी बातमी समोर आली आहे. आता SSC द्वारे घेतलेल्या जाणाऱ्या सरकारी नोकरी भरती परीक्षा इथून पुढे 15 भाषांमध्ये घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. भाषेच्या अडचणीमुळे कोणत्याही तरुणाने सरकारी नोकरीची संधी चुकवू नये; यासाठी SSC ने हा निर्णय घेतला आहे. यामुळे तरुणांच्या सहभागाला चालना  तसेच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

या भाषेत होणार परीक्षा
इथून पुढे सरकारी नोकर भरती परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त प्रश्नपत्रिका आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी या 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे. तर लेखी परीक्षा 22 अनुसूचित भाषांमध्येही (SSC Exams) आयोजित केली जाणार आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. ही माहिती 14 व्या हिंदी सल्लागार समितीच्या बैठकीत बोलताना जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

अनेक राज्यांनी केली होती मागणी
दक्षिणेतील अनेक राज्ये सातत्याने इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये SSC परीक्षा घेण्याची मागणी करत होते. या मागणीचा विचार करुन सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता, स्टाफ सिलेक्शन कमिशनने नुकतेच उमेदवारांसाठी 15 भाषांमध्ये चाचणी देण्याचे स्वरूप अनावरण केले आहे. आणि सर्व 22 अनुसूचित भाषांमध्ये लेखी चाचणी घेण्यास अनुमती देण्याची योजना आखली जात आहे.

सरकारचा ऐतिहासिक निर्णय (SSC Exams)
केंद्राने एसएससीद्वारे (SSC) आयोजित सरकारी नोकरी भरती परीक्षा 15 भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे याचा मोठा फायदा तरुणांना होणार आहे. सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या 14 व्या हिंदी सल्लागार समितीच्या बैठकीत जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, या ऐतिहासिक निर्णयामुळे स्थानिक तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन मिळेल आणि प्रादेशिक भाषांना देखील प्रोत्साहन मिळेल. सध्या NEET, JEE आणि CUET या परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त विविध स्थानिक भाषांमध्ये घेतल्या जात आहेत. आता एसएससी परिक्षा देखील विविध भाषेत घेतल्या जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com