Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेला गालबोट; पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा, गैरप्रकार करणाऱ्यांना अटक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीची (Talathi Bharti 2023) परीक्षा गुरुवारी (दि. 17 ऑगस्ट) सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरु होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या होतकरू उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत आहे. यासाठी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. गुरुवार दि. 17 ऑगस्टपासून राज्यातील विविध केंद्रांवर या (Talathi Bharti 2023) परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता पहिल्या सत्रातील परीक्षा होती. याचवेळी नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवार गैरप्रकार करत असल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूर येथील परीक्षा केंद्रावरूनही प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com