GK Updates : सूर्य आणि चंद्रावरुन प्रकाशकिरण पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो? पहा खगोलशास्त्राविषयी काही प्रश्नांची उत्तरे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया खगोलशास्त्राविषयी (Astronomy) असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. ऑक्टोबर २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने (IAU) कोणत्या ग्रहाचे ग्रहपद काढून त्याचा समावेश छोट्या ग्रहांच्या समूहात केला ?
उत्तर – प्लुटो
2. सर्वप्रथम आकाशगंगेबाबत भाकित करणारा खगोलशास्त्रज्ञ कोण ?
 उत्तर – हर्षल
3.
सूर्याचे प्रकाशकिरण पृथ्वीवर पोहोचायला किती मिनिटे लागतात?
उत्तर – ८ मिनिटे १६ सेकंद

4. चंद्रावरून प्रकाशकिरण पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो ?
उत्तर – १.३ सेकंद (GK Updates)
5.
सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – बुध
6.
पृथ्वीपासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – शुक्र

7. ग्रहांमध्ये सर्वाधिक घनता पृथ्वीची आहे, तर सर्वांत कमी घनत्व असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – शनी
8.
कोणत्या ग्रहाची परिवलन व परिभ्रमण या दोन्ही गती जवळपास सारख्याच आहेत ?
उत्तर – शुक्र
9.
सर्वांत कमी परिवलन गती कोणत्या ग्रहाची आहे?
 उत्तर – शुक्र
10.
(GK Updates) सूर्यकुळातील सर्वांत मोठा ग्रह गुरू आहे, तर सर्वांत लहान ग्रह कोणता आहे?
उत्तर – बुध
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com