करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1. चंद्रावर खेळला गेलेला पहिला खेळ कोणता होता?
उत्तर – 1971 मध्ये 6 फेब्रुवारी रोजी अपोलो -14 ने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला होता. या मिशनवर गेलेले अंतराळवीर एलन शेफर्ड गोल्फर होते. ते या मिशनवर आपल्यासोबत गोल्फ स्टिक आणि गोल्फचे चेंडूदेखील घेऊन गेले होते.
प्रश्न 2. गुडघ्याला लावल्या जाणाऱ्या पॅडचे शास्त्रीय नाव काय आहे?
उत्तर – गुडघ्याच्या पॅडचे शास्त्रीय नाव नाव पटेला आहे.
प्रश्न 3. असे कोणते फूल आहे ज्याचे वजन 10 किलोपर्यंत आहे?
उत्तर – रेफ्लेसिया. (रेफ्लेशिया फुल मुख्यत्त्वे मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आढळते)
प्रश्न 4. (GK Updates) पकोड्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
उत्तर – पकोडाला इंग्रजीमध्ये Fritters म्हणतात. हा शब्द सर्व प्रकारच्या पकोडासाठी वापरला जातो, फक्त त्यापुढे आपल्याला बटाटा किंवा कांदा यासारखे इंग्रजी नाव लिहावे लागेल. उदा. Potato Fritters Or Onion Fritters
प्रश्न 5. भारतात असे कोणत्या प्रकारचे भोजन आहे, जे कोळशावर शिजवले जाते?
उत्तर – तंदूरी कोळशावर शिजवले जाते.
प्रश्न 6. झोपेतच स्वप्ने का पडतात?
उत्तर – वैज्ञानिक संशोधनानुसार, प्रत्येक व्यक्ती झोपेमध्ये किमान दोन ते तीन वेळा स्वप्न पाहते. त्या व्यक्तीला काही स्वप्ने लक्षात राहतात, तर काही स्वप्नांचा विसर पडतो. झोपेवेळी व्यक्तीची जी मानसिक स्थिति असते, त्याचसंबंधी स्वप्ने दिसतात.
प्रश्न 7. कोणती नदी आपला रंग बदलते?
उत्तर – या नदीचे नाव कॅनो क्रिस्टल्स असून ही नदी कोलंबियामध्ये वाहते. या नदीचे वैशिष्ट्य असे की ही नदी प्रत्येक हंगामामध्ये आपला रंग बदलते.
प्रश्न 8. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते आहे?
उत्तर – चहा हे भारताचे राष्ट्रीय (GK Updates) पेय असून 17 एप्रिल 2013 रोजी भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून चहाची घोषणा करण्यात आली.
प्रश्न 9. सौरमंडलचा जनक कोणाला म्हटले जाते?
उत्तर – सूर्याला सौरमंडलचा जनक म्हटले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com