MPSC Success Story : खासगी शिकवण्या घेवून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं; डोंगराळ भागातील अमृता जिद्दीने बनली PSI

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात संकटं कोणाच्या (MPSC Success Story) दारात येत नाहीत? प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या संकटाला तोंड देत शेवटचा प्रवास करावा लागतो. एखाद्या माणसामध्ये असलेली जिद्द आणि चिकाटी सोबतच स्वतःवरील दृढ विश्वास यामुळे कुठलंही संकट फार मोठं वाटत नाही. आपल्या घरात प्रत्येक सुख सुविधा आपले आई बाबा उपलब्ध करून देत असतात, पण याचवेळी आपल्या वयाची अशी अनेक मुलं आहेत जी कष्ट करत, मेहनत करत इतरांसमोर  आदर्श उभा करतात. आजची कहाणी अशाच एका मुलीची आहे. महाराष्ट्रातील छोट्याशा भागात वाढलेली अमृता बाठे हिने PSI होण्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं याबद्दलची ही कथा…

पैसे कमवण्यासाठी केली खासगी क्लासमध्ये नोकरी
किल्ले पुरंदरच्या उपर डोंगराळ रांगेतील कुंभोशी येथे राहणारी अमृता हीच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. घरची गरीबी एवढी जास्त की जर तिने स्वतः कमावलं तरच ती शिकू शकली असती. तिचे वडील भरत बाठे व आई संगीता दोघेही या डोंगराळ भागात शेती करतात. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिता हिने पुण्यात काही खासगी क्लासमध्ये शिकवण्या द्यायला सुरुवात केली. अमृताच्या पाठोपाठ तिचा एक भाऊ व एक बहीण देखील आहेत.

सरकारी शाळेत घेतले शिक्षण (MPSC Success Story)
अमृताचे प्राथमिक शिक्षण हे तिच्या गावातल्या एका सरकारी शाळेतून झाले, पण यापुढील शिक्षणाची गावात काहीच सोय नसल्यामुळे अमृताने पुण्यातील महर्षी धोंडो केशव कर्वे येथील महिला वसतिगृहात प्रवेश मिळवला व या पुढील शिक्षण तिने महर्षी कर्वे या शाळेतून पूर्ण केले. शाळेत असतानाच तिने पोलीस होण्याची इच्छा जोपासली व आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथूनच तिचा प्रवास सुरू झाला.

19 महिन्यांनी दिली परीक्षा
अपयश तिच्या देखील वाट्याला आलं पण खचून न जाता तिने अपयशापेक्षा मोठं व्हायचं ठरवलं. पुण्यातील श्री सिद्धिविनायक महाविद्यालयातून तिने BA ची पदवी मिळवली. खर्च भागत नसल्यामुळे तिने काही खाजगी क्लासेस मधून शिक्षिकेचे कार्य केले. वर्ष 2019 मध्ये तिने पहिल्यांदा MPSC ची परीक्षा दिली पण केवळ दोन गुणांनी तिला अपयश आले. इथे हार न मानता 2020 च्या परीक्षेत पास होण्याची खूण गाठ तिने मनाशी बांधली. पण 2020 हे वर्ष कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनमुळे ही परीक्षा चार वेळा (MPSC Success Story) पुढे ढकलली गेली. परिणामी तब्बल 19 महिन्यांनी अमृताला ही परीक्षा देण्याची संधी मिळाली‌. अखेर परीक्षेचा निकाल लागला आणि तिच्या कष्टांचे चीज होत तिची यावेळी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. यावेळी ती आपल्या आजोळी वाघजवाडी येथे रहात होती.

अमृता म्हणते …
तिच्या प्रवासाविषयी सांगताना अमृता म्हणते, “शिक्षण व नंतरच्या धडपडीचा काळ हा माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी खूपच चिंतेचा होता. तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम राहून अभ्यास सुरूच ठेवला. प्रयत्न करत राहिले  की यश नक्कीच मिळतं…”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com