करिअरनामा ऑनलाईन । भारत हा एक प्रगती करणार देश आहे. आणि (Education or Personal Loan) अशा देशात शिक्षित लोकांचा मोठा वाटा असणे हे देखील देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आजकाल आपल्या देशात लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटतंय, गावागावातील अनेक पालक आपल्या मुलांना शिक्षित बनवण्यासाठी धडपड करतायेत. प्रत्येक आई-वडिलांना असं वाटत असतं की आपलं मूल डॉक्टर, इंजिनीयर, एच आर व्हावं पण यासाठी लागणाऱ्या फीची रक्कम मात्र थेट गगनाला भिडली आहे. भारतातील सामान्य माणसाला परवडणारी ही रक्कम मुळीच नाही. पण तरीही आपल्या मुला/मुलीचे शिक्षण पूर्ण करण्याचा अट्टाहास बाळगत पालक जमेल तसा पैसा गोळा करतात. बऱ्याच वेळा मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालक कर्ज घेतात. मात्र नेमकं कुठलं कर्ज घ्यावं, शिक्षणासाठी किती कर्जाचे प्रकार उपलब्ध आहेत आणि कोणतं कर्ज आपल्या फायद्याचं ठरेल याबद्दल पुरेशी माहिती आपल्याजवळ नसते. काय आहे पर्सनल आणि एज्युकेशन लोन हे जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा.
१) पर्सनल लोन म्हणजे काय?
पर्सनल लोनला मल्टीपर्पज लोन किंवा कंज्यूमर लोन असं म्हणूनही ओळखलं जातं. बँक किंवा इतर आर्थिक संस्था गरजू माणसाला काही रक्कम उधार म्हणून देत असतात. ही रक्कम देत असताना, त्या माणसाची कर्ज परत करण्याची क्षमता आहे का, त्याचा पगार किती आहे किंवा याआधी त्याने (Education or Personal Loan) कर्जाची परतफेड केलेली आहे का अशा गोष्टी लक्षात घेतल्या जातात. शक्यतो पर्सनल लोन 1 ते 5 वर्षांसाठी दिलं जातं, आपली परतफेड करण्याची क्षमता ओळखून आपण ते कर्ज घ्यावं. इतर कर्जाच्या तुलनेत इथे जास्त कागदपत्रे देखील देण्याची गरज नसते. तुमची आर्थिक स्थिती ओळखून EMI ठरवला जातो. या EMI नुसार प्रत्येक महिन्यात तुम्ही एक ठराविक रक्कम परत करायची असते.
आवश्यक कागदपत्रे (Documents)
१) इन्कम प्रुफ ( salary slip, bank account statement)
२) रहिवासी पुरावा आणि ओळखपत्र
३) लायसन्स ( व्यवसाय असलेल्यांसाठी)
२) शैक्षणिक कर्ज म्हणजे काय? (Educational Loan)
एज्युकेशन लोन हे मुलांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिलं जातं. यामध्ये ट्युशन फी, पुस्तकं किंवा शिक्षणाच्या बाबतीत आवश्यक खर्च पुरवण्यासाठी पैसे दिले जातात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिने किंवा एक वर्षाच्या कालावधीत ह्या लोनची परतफेड ही त्या विद्यार्थ्याने करायची असते. एज्युकेशन लोनचा इंटरेस्ट रेट देखील फार कमी असतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी रक्कम परत करण्यासाठी सक्षम असल्याचे गृहीत धरून हे लोन दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे( Documents)
१) दहावी आणि बारावीचे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट.
२) कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचे ऍडमिशन लेटर
३) फी स्ट्रक्चर
४) KYC डॉक्युमेंट
५) उत्पन्नाचा दाखला
पर्सनल आणि एज्युकेशन लोन मध्ये फरक काय?
एज्युकेशन लोन घेणाऱ्या विद्यार्थ्याला ७.५ लाख ते १.५ कोटी पर्यंत लोन मिळू शकते. पण पर्सनल लोनच्या बाबतीत मात्र ही रक्कम केवळ २५ लाख आहे जी जास्तीत जास्त ४० लाख पर्यंत जाऊ शकते. दोन्ही प्रकारच्या लोनमध्ये इंटरेस्ट रेटचा देखील फरक पाहायला मिळतो ज्यात एज्युकेशन (Education or Personal Loan) लोनचा इंन्ट्रेस्ट रेट हा ८.४५-१०.५% आहे. तर पर्सनल लोनचा आकडा हा मोठा असून १०.५-२४% प्रमाणे इंटरेस्ट रेट भरावा लागतो. पर्सनल लोन हे पालकांच्या नावी रुजू झाल्यामुळे कर्जाची रक्कम पालक स्वतः फेडत असतात तर एज्युकेशन लोन हे विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फेडायचे असते. एज्युकेशन लोन ची अजून एक आकर्षक बाब म्हणजे विद्यार्थिनींसाठी एज्युकेशन लोनचा इंटरेस्ट रेट हा फक्त ०.५% आहे.
एखादा विद्यार्थी जर आपल्या स्वबळावर शिक्षण पूर्ण करू इच्छित असेल तर त्याने एज्युकेशन लोनचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. कारण एज्युकेशन लोन हे विद्यार्थ्याला रकमेची परतफेड करण्यासाठी पुरेसा वेळ देत असते याउलट जर पालकांना सवलतीचा दरात आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करायचे असेल तर ते पर्सनल लोनचा वापर करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com