यूपीएससी मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशात पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक सराफ अव्वल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नवी दिल्ली । नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) २०१९ प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी युपीएससीच्या अधिकृत वेसबाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

युपीएससीने सप्टेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या लेखी आणि फेब्रुवारी-ऑगस्टदरम्यान झालेल्या मुलाखीत आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली असून ११ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान २०१९ मध्ये प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) कोट्यातून ७८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

नियुक्ती मिळणार असलेल्या उमेदवारांचा प्रवर्गनिहाय तपशील पुढीलप्रमाणे-
सर्वसाधारण गट – ३०४
आर्थिक वंचित गट – ७८
इतर मागासवर्गीय – २५१
एससी – १२९
एसटी ६७

निकालाची संपूर्ण यादी साठी इथे क्लीक करा upsc 2019results

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”