करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
1. प्रश्न : जिल्हा गॅझेटियर म्हणजे काय?
उत्तर : इंग्रजांच्या काळात तो दरवर्षी तयार केला जायचा, त्यात संपूर्ण जिल्ह्याच्या नोंदी ठेवल्या जायच्या.
2. प्रश्न: सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात?
उत्तर : 7 रंग. (GK Updates)
3. प्रश्न : जर एखाद्या मुलाने मुलीला प्रपोज केले तर ते गुन्ह्याच्या कक्षेत येईल का?
उत्तर : नाही, कारण आयपीसीच्या कोणत्याही कलमात, प्रस्ताव मांडणे गुन्हा म्हणून वर्गीकृत केलेले नाही.
4. प्रश्न : मानवी डोळ्याचे वजन किती आहे?
उत्तर : डोळ्याचे वजन फक्त 8 ग्रॅम आहे.
5. प्रश्न : कोणता प्राणी असा आहे की त्याचे डोके कापल्यानंतरही तो बरेच दिवस जगू शकतो?
उत्तर : झुरळ.
6. प्रश्न : भारतातील सर्वात महागडे शहर कोणते आहे?
उत्तर : मुंबई.
7. प्रश्न : पेट्रोल पंपावर कोणत्या प्रकारचे कपडे घालू नयेत?
उत्तर : सिंथेटिक.
8. प्रश्न : रेल्वेमध्ये बसवलेल्या W/L बोर्डचा अर्थ काय आहे?
उत्तर : जिथे W/L बोर्ड बसवलेले असतात, तिथे ड्रायव्हरला हॉर्न वाजवावा लागतो.
9. प्रश्न (GK Updates) : सावली नसलेल्या वस्तूचे नाव सांगा?
उत्तर : रस्ता.
10. प्रश्न : असे काय आहे जे महासागरात घडते आणि तुमच्या घरात असते?
उत्तर : मीठ.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com