करिअरनामा ऑनलाईन । छोट्या पडद्यावरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या प्रसिध्द (Success Story) मालिकेत महाराणी येसुबाईचे पात्र साकारणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नुकतंच इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. अभिनेत्री म्हणून प्राजक्ताचा प्रवास सुरू होता; पण त्यासोबत ती शिक्षणदेखील पूर्ण करत होती. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे.
प्राजक्ताने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे तिने फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवलं आहे. तिने पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्ससिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
“अखेर मी इंजिनिअर अभिनेत्री झाले” (Success Story)
फोटो शेअर करत प्राजक्ताने लिहिलं आहे,”फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण. 10 पैकी ग्रेड आहे 8.77. आता अखेर मी इंजिनिअर अभिनेत्री झाले. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत तिचं अभिनंदन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने आलिशान घर घेतलं आहे.
प्राजक्ता सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या बहुचर्चित (Success Story) महानाट्यात काम करत आहे. प्राजक्ता लवकरच एका दाक्षिणात्य सिनेमातही झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील शूटिंगदरम्यानचे फोटो तिने शेअर केले होते. ‘मुरारबाजी’ या ऐतिहासिक सिनेमातही ती दिसणार आहे.
अशी आहे प्राजक्ताची अभिनय कारकिर्द
प्राजक्या गायकवाड ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘नांदा सौख्य भरे’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई माझी काळुबाई’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम (Success Story) केलं आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने साकारलेली येसूबाईंची भूमिका चांगलीच गाजली होती. ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेला रामराम केल्याने अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली होती. प्राजक्ता लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com