करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये काम करण्यासाठी अनेकजण (Interview Tips) आतुरलेले असतात. येथे नोकरी मिळविणे सहज सोपे नाही. या कंपनीच्या HR डिपार्टमेंटच्या एका माजी अधिकाऱ्याने उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत ज्यामुळे त्यांना गुगलमध्ये नोकरी मिळू शकते. गुगलची नोकरी मिळणे अत्यंत कठीण आहे कारण त्यांच्याकडे दरवर्षी 20 लाखांहून अधिक लोक अर्ज करतात. हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यापेक्षाही कठीण आहे. म्हणूनच जर तुम्हाला गुगलमध्ये नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या Resume मध्ये बदल करण्याची गरज आहे.
फापटपसारा टाळा –
बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार 2012 ते 2015 पर्यंत गुगल रिक्रूटर म्हणून काम करणारे नोलन चर्च Resumeमध्ये दोन मोठ्या चुका टाळण्याचा सल्ला देतात. पहिली गोष्ट म्हणजे मोठे पॅराग्राफ लिहिणे. तसेच लांबलचक वाक्य लिहिणे. जर तुमचा Resume मोठा दिसत असेल तर (Interview Tips) तुमचा रेझ्युमे भरती प्रक्रियेत कधीच पुढे जाणार नाही.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संक्षिप्त लिखान करणे. जे काय आहे ते स्पष्ट आणि थोडक्यात लिहिणे. जर तुम्ही थोडक्यात काही सांगू शकत नसाल तर याचा अर्थ असा होतो कि तुम्ही कामाच्या ठिकाणी सुद्धा प्रभावीपणे संवाद साधू शकत नाही. यासाठी नोलन चर्च ChatGPT किंवा Grammarly या AI टूल्सचा वापर करण्याचा सल्ला देतात. ही टूल्स रेझ्युमे बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत.
या गोष्टी ठेवा लक्षात – (Interview Tips)
गुगलचे आणखी एक माजी अधिकारी लाझलो बॉक, ज्यांनी कंपनीत 20 वर्षे घालविली, त्यांनी तिथे असताना 20,000 पेक्षा जास्त Resume पाहिले. काही सामान्य त्रुटीही त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. बऱ्याच Resumeमध्ये टायपिंग एररमुळे स्पेलिंगच्या चुका होतात. काहींचं खराब फॉरमॅटिंग असतं किंवा काही रेझ्युमे खूप लांबलचक होतात. एकदा इंटरव्ह्यू रूममध्ये गेल्यावर रिझ्युमेचा तितकासा फरक पडत नाही यासाठी Resume सुटसुटीत ठेवा आणि अनावश्यक तपशील कमी करा.
जर तुम्ही गुगल किंवा कोणत्याही स्पर्धात्मक कंपनीत नोकरीचे (Interview Tips) ध्येय ठेवत असाल तर या टिप्स गांभीर्याने लक्षात ठेवा. एक व्यवस्थित आणि संक्षिप्त Resume तुम्हाला एक चांगली नोकरी मिळवून देऊ शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com