BARTI UPSC Coaching 2023 : UPSC करणाऱ्यांसाठी ‘बार्टी’ देतय मोफत प्रशिक्षण; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (BARTI UPSC Coaching 2023) वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ( Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute / BARTI) वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत अनिवासी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे आहेत.

यासाठी यंदा 300 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ही निवड करण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेतली जाणार आहे. ही CET येत्या दि. 27 ऑगस्ट रोजी घेतली (BARTI UPSC Coaching 2023) जाणार असून, यामध्ये गुणानुक्रमे आणि संवर्गानिहाय पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले.
इथे करा अर्ज –
CET परीक्षेसाठी इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी www.siac.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
300 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ – (BARTI UPSC Coaching 2023)
राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील (SC) एकूण 300 विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या ( पूर्व व मुख्य) पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी पुरस्कृत केले जाणार आहे.

आरक्षणाचा तपशील –
एकूण 300 जागांपैकी महिलांसाठी 30 टक्के जागा (90 जागा) या महिलांसाठी, दिव्यांग व्यक्तीसाठी (Person With Disability) 4 टक्के जागा (12 जागा) आणि अनुसूचित (BARTI UPSC Coaching 2023) जातीअंतर्गत येत असलेल्या वंचित जातींमधील (वाल्मीकी व तत्सम जाती उदा. होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी आदी) विद्यार्थ्यांकरिता 5 टक्के जागा (15 जागा) राखीव असणार आहेत.
विद्यार्थ्यांकडे ही पात्रता असणे आवश्‍यक –
1. विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
2. संबंधितांकडे राज्यातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
3. इच्छुक विद्यार्थी हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
4. विद्यार्थ्याचे वय हे संघ लोकसेवा आयोगाच्या अटी व शर्तीनुसार असावे.
5. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी पात्र असावा.
6. वार्षिक उत्पन्न कमाल 8 लाखापर्यंत असावे

दरमहा प्रत्येकास 13 हजार रुपये विद्यावेतन
या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण शुल्क भरण्यात येते. याशिवाय हे प्रशिक्षण अनिवासी असल्याने या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील निवास व भोजनाच्या व्यवस्थेकरिता दरमहा प्रत्येकी रक्कम 13 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. (BARTI UPSC Coaching 2023)
या प्रशिक्षणाच्या सुरवातीस दिल्ली येथे जाण्याकरिता प्रत्येकी 5 हजार रुपये (फक्त एकदा) आणि प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासाकरिता प्रत्येकी 5 हजार रुपये (फक्त एकदा) प्रवास खर्च दिला जातो. तसेच पहिल्या महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 3 हजार रुपये हे एकरकमी दिले जातात, असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com