EPFO Exam : EPFO SSA स्टेनोग्राफर्स परीक्षा जाहीर; इथे पहा वेळापत्रक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO Exam) सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि स्टेनोग्राफर्स स्टेज 1 भरती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्यांनी EPFO लेखी परीक्षा 2023 साठी अर्ज सादर केले आहेत ते EPFOच्या recruitment.nta.nic.in या वेबसाइटवर सविस्तर वेळापत्रक पाहू शकतात. अधिकृत वेळापत्रकानुसार स्टेनोग्राफर भरती परीक्षा दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी घेतली जाईल, तर एसएसए परीक्षा 18, 21 आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी होईल.

या भरती परीक्षांद्वारे एकूण 2859 एसएसए आणि स्टेनोग्राफर पदे (EPFO Exam) भरली जाणार आहेत. कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा (फेज-I) आणि कॉम्प्युटर टायपिंग टेस्टच्या (फेज-II) निकालांचा उपयोग अर्जदार पुढील फेरीत जाण्यासाठी पात्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी केला जाईल. EPFO SSA पूर्व परीक्षेत एकूण 600 गुणांसाठी, ऑनलाईन पद्धतीनं 150 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न सोडवण्यासाठी 2 तास 30 मिनिटांचा कालवधी दिला जाईल.

असं  डाउनलोड करा वेळापत्रक –
1. ईपीएफओ एसएसए आणि स्टेनोग्राफर भरतीच्या वेळापत्रकासाठी ईपीएफओच्या recruitment.nta.nic.in या वेबसाइटला भेट द्या.
2. परीक्षेच्या वेळापत्रकाची लिंक शोधण्यासाठी ‘नोटिफिकेशन टॅब’ निवडा.
3. ईपीएफओ एसएसए आणि स्टेनोग्राफर शेड्युल लिंकवर क्लिक करा.
4. स्क्रीनवर PDF स्वरूपात परीक्षेचं वेळापत्रक दिसेल. (EPFO Exam)
5. परीक्षेची तारीख, वेळ आणि इतर आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी PDF वाचा.

थोडक्यात महत्वाचे – (EPFO Exam)
स्टेनोग्राफर पोस्टच्या माहिती पत्रिका 22 जुलै रोजी दिल्या जातील. अॅडमिशन कार्ड्स परीक्षेच्या नियोजित तारखेच्या दोन ते तीन दिवस आधी उपलब्ध करून दिली जातील. एसएसएच्या माहिती पत्रिका ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्या जातील. ईपीएफओ एसएसएची अॅडमिशन कार्ड्स 15 किंवा 16 ऑगस्ट 2023 रोजी उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. कारण, एसएसएचा पेपर 18 ऑगस्ट रोजी नियोजित आहे. स्टेनोची अॅडमिशन कार्ड्स 29 ते 30 जुलैदरम्यान कधीही उपलब्ध करून दिली जाऊ शकतात.
परीक्षेसंबंधी लेटेस्ट आणि अधिकृत (EPFO Exam) माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी एनटीए वेबसाइटला वारंवार भेट दिली पाहिजे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या प्रक्रियेतही उमेदवारांना पास व्हावं लागेल त्यानंतर संबंधित पदावर नोकरी करण्याची संधी त्यांना मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com