UPSC Success Story : वडील IPS…भाऊ IAS…आई मंत्रालयात अन् आता मुलगा झाला IAS; सलग 3 वेळा क्रॅक केली UPSC

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दिल्लीच्याअनिरुद्ध यादवने UPSC परीक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतात 8 वा क्रमांक मिळवला आहे. अनिरुद्धचे  संपूर्ण कुटुंब नागरी सेवेत कार्यरत आहे. त्याचे वडील IPS मनोज यादव हे हरियाणाचे माजी DGP राहिले आहेत. तर त्याचा मोठा भाऊ आदित्य विक्रम हा देखील IAS अधिकारी असून तो आसाममध्ये सेवा बजावत आहे तर अनिरुध्दच्या आईने वाणिज्य मंत्रालयातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.

एकामागोमाग एक क्रॅक केल्या परीक्षा
अनिरुद्ध यादवने IIT दिल्लीतून M.Tech पूर्ण केले आहे. UPSC देत असताना पहिल्याच प्रयत्नात त्याने ही परीक्षा क्रॅक केल्यानंतर त्याला IRPS म्हणजेच भारतीय रेल्वे कार्मिक (UPSC Success Story) सेवा मिळाली. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने भारतीय माहिती सेवा म्हणजेच IIS पद मिळवले. तर चौथ्या प्रयत्नात त्याने संपूर्ण भारतातून 8 वी रँक मिळवून IAS पद मिळवले आहे.

दररोज 16 ते 17 तास अभ्यास
अनिरुद्धच्या आवडत्या खेळांमध्ये फुटबॉल आणि स्क्वॅश यांचा समावेश आहे. खेळाची आवड जोपासत असताना UPSC पास करण्यासाठी अनिरुद्धने विशेष तयारी केली आहे. तो दिवसातून 16 ते 17 तास अभ्यास करायचा. UPSC CSE क्रॅक करण्याच्या टिप्स शेअर करताना, अनिरुद्ध म्हणाला की, “प्रत्येक (UPSC Success Story) उमेदवाराने स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे; कारण तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा पास  होण्यासाठी कठोर मेहनत आणि दीर्घ अभ्यासक्रमाची आवश्यकता असते.”

IAS च व्हायचं होतं (UPSC Success Story)
अनिरुद्धला 10वीमध्ये 90.6%आणि 12वीत 94.2% मार्क मिळाले होते. 27 वर्षीय अनिरुद्धचा UPSC चा हा चौथा प्रयत्न होता. त्याने सांगितले की 2019 मध्ये त्याने पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली होती. मात्र, नंतर त्याला IRPS (इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसेस) मिळाली. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी भारतीय माहिती सेवा म्हणजेच IISची नोकरी मिळाली; तरी त्याचे समाधान होत नव्हते. त्याने पुन्हा परीक्षा देवून अखेर IAS पद मिळवलेच.

यशाचे श्रेय कुटुंबाला
अनिरुद्धने त्याच्या यशाचे श्रेय संपूर्ण कुटुंबाला दिले आहे. त्याचे वडील सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात महासंचालक (तपास) म्हणून कार्यरत आहेत; मोठा भाऊ IAS अधिकारी असून तो (UPSC Success Story) आसाममध्ये तैनात आहे तर त्याची आई वाणिज्य मंत्रालयातून सेवा निवृत्त झाली आहे. संपूर्ण कुटुंबच नागरी सेवेत कार्यरत असल्यामुळे सर्वांच्या ज्ञानाचा फायदा अनिरुद्धला झाला. “हे यश माझ्या एकट्याच्या प्रयत्नाने मिळाले नसून कुटुंबाने केलेल्या एकत्रित प्रयत्नामुळे मी यशस्वी झालो आहे;” असे अनिरुद्ध सांगतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com