Engineering Admission 2023 : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे (Engineering Admission 2023) वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CET कक्षाकडून या संबंधी माहिती देण्यात आली असून, प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
एमएच-सीईटीचा निकाल 12 जून रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर लगेचच पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र यासाठी विद्यार्थ्यांना दोन आठवडा वाट पहावी लागली. राज्यातील खाजगी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत, यासाठीच CET सेल कडून प्रवेशास विलंब केला जात असल्याचा आरोप होत होता.

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज – (Engineering Admission 2023)
अखेर उशिरा का होईना सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दि. 3 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

अर्ज फी –
महाराष्ट्रातील खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तसेच (Engineering Admission 2023) महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये नोंदणी शुल्क असून आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये शुल्क आहे .तर एनआरआय, पीआयओ कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी 5 हजार रुपये शुल्क आहे.
काही महत्त्वाच्या तारखा –
1. प्रवेश नोंदणी – 24 जून ते 3 जुलै 2023
2. कागदपत्रांची तपासणी – 24 जून ते 4 जुलै 2023
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com