NEET Topper : एकत्र शाळेत जायच्या; एकाचवेळी पास केली NEET; आता तिघीही होणार डॉक्टर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । डॉक्टर होण्यासाठी देशभरातील (NEET Topper) उमेदवार मोठ्या संख्येने NEET परीक्षा देत असतात. जे प्रामाणिक पर्यटन करतात त्यांना निश्चितपणे या परिक्षेत यश मिळतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल; पण एकाच कुटुंबातील 3 मुली NEET परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत आणि आता त्या डॉक्टर होण्यासाठी पुढचा अभ्यास करण्यासाठी तयार झाल्या आहेत.

विशेष म्हणजे या तिन्ही बहिणी पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. अर्बिश, रुतबा बशीर आणि तुबा बशीर असं या तीन बहीणींचं नाव आहे. या तीघी श्रीनगरमधील नौसेरा येथे राहतात. NEET परीक्षेचा निकाल जाहीर होताच या तीन बहिणींच्या (NEET Topper) आनंदाला पारावार उरला नाही.
अर्बिश, रुतबा बशीर आणि तुबा बशीर या तीघी चुलत बहिणी आहेत. आपल्या यशाबद्दल बोलताना अर्बिश म्हणाली की, “मी खूप आनंदी आहे, आजपर्यंत आमच्या कुटुंबात एकही डॉक्टर नव्हता. माझं स्वतःचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे. आम्हाला पालकांनी सुरुवातीपासून पाठिंबा दिल्यामुळे आज आम्ही डॉक्टर बनण्यास तयार झालो आहोत.”

रुतबा बशीरने सांगितले की, “आम्ही 11वीपासून NEET परीक्षेची (NEET Topper) तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात आम्हाला यश मिळाले हे चांगले आहे. आमच्या यशाचे श्रेय आमच्या पालकांना जाते, त्यांनी आम्हाला लहानपणापासून सर्व गोष्टीत साथ दिली.”
तुबा बशीर म्हणाली की, “आम्ही पहिल्यापासून शाळेत आणि कोचिंग क्लासला एकत्र जायचो. आता आम्ही तिघेही NEET परीक्षा एकत्र उत्तीर्ण झालो आहोत. आम्ही तीघी MBBSची परीक्षा पास होऊन डॉक्टर होणार या विचाराने मी खूप आनंदी आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com