SET Exam Results 2023 : ‘या’ तारखेला जाहीर होणार सेट परीक्षेचा निकाल; इथे पहा निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्राध्यापक (SET Exam Results 2023) पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षेचा निकाल दि. 28 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याविषयी माहिती दिली आहे.

दि. 26 मार्च रोजी राज्यभरातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास 1 लाख 19 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, अंतिम उत्तरतालीका आल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होण्याची प्रतीक्षा लागून राहिली होती.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने लवकरच निकाल घोषीत करू असं सांगितलं होतं पण त्यासंबंधीचे नोटीफिकेशन संकेतस्थळाहून हटवल्याने विद्यार्थी (SET Exam Results 2023) संभ्रमावस्थेत होते. अखेरीस विद्यापीठाने सेटच्या निकालाची अधिकृत घोषण केल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://setexam.unipune.ac.in/ या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com