Career Success Story : कौतुकास्पद!! अवघ्या 21व्या वर्षी मिळालं तब्बल 45 लाखांचं पॅकेज; कोण आहे ही तरुणी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एका तरुणीला अवघ्या 21 व्या वर्षीच (Career Success Story) जॅकपॉट लागला आहे. पदवी हाती येताच या तरुणीला तगड्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. या तरुणीकडे थोडं थोडकं नव्हे तर तब्बल 45 लाखाचं पॅकेज असणारी नोकरी चालून आली आहे. जपानमधील आयटी कंपनीत रुजू होण्यासाठी ही तरुणी लवकरच रवाना होणार आहे. कोणत्या क्षेत्रात आपण करिअर करायचं हे तरुणांना समजत नाही. पण या तरुणीने तिचे ध्येय अगोदरच निश्चित केलं होतं. त्या दृष्टीने तिने शिक्षणही पूर्ण केले. तिने टँलेन्टच्या जोरावर डेटा ॲनालिस्ट पदावर नोकरी मिळवली आहे.

तान्या सिंह धाभाई (Career Success Story)
तान्या सिंह धाभाई असं या तरुणीचं नाव आहे. राजस्थानमधील झुंझनूतील पिलानी हे त्यांचे मुळ गाव आहे. ती जपानच्या जगप्रसिद्ध आयटी कंपनी टेक एममध्ये डेटा ॲनालिस्ट म्हणून काम पाहणार आहे. लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती. ती शाळेत टॉपर होती. पहिल्याच प्रयत्नात तिने बिट्स पिलानीत प्रवेश मिळवला. जपानची राजधानी टोकियो शहरात ती काम करणार आहे.

वडील टेलिकॉम कंपनीचे उपाध्यक्ष
तान्या सिंहचे वडील हजारी सिंह धाभाई हे जपानमधील टेलिकॉम कंपनी राकूतेनचे उपाध्यक्ष आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून या कंपनीत काम करत आहेत. तर त्यांना (Career Success Story) जपानमध्ये दहा वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. त्यांनी अनेक जपानी कंपन्यांमध्ये काम केले आहे.

पदवी घेताच आठव्या दिवशी मिळाली नोकरी
तान्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. ती परीक्षेच्या निकालात नेहमी टॉपर ठरायची. पहिल्याच प्रयत्नात तिने बिट्स पिलानीत प्रवेश मिळवला. पदवी परीक्षा (Career Success Story) उत्तीर्ण होताच अवघ्या आठव्या दिवशी तिला जपानमधील टेक एम या आयटी कंपनीने ऑफर लेटर दिले. हे तान्याच्या मेहनतीचे फळ म्हणावं लागेल.

जगभरातील 200 विद्यार्थ्यांमधून निवड
तान्या सिंहचे वडील हजारी सिंह यांना मुलीचे खूप कौतुक आहे. हावर्ड वर्ल्ड स्टूडेंट्स लीडर्स प्रोग्राम साठी जगभरातील 200 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. यामध्ये जगभरातील यशस्वी उद्योजक, अर्थतज्ज्ञ, प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होतात. इथे ते त्यांचे अनुभव शेअर करतात. तर विद्यार्थ्यांना (Career Success Story) त्यांच्याशी चर्चा करण्याची, त्यांच्या कल्पना, योजना मांडण्याची संधी दिली जाते. भारतातील काही विद्यार्थ्यांची या प्रोगामसाठी निवड झाली आहे. त्यात तान्या सिंहची पण निवड झाली आहे. पण काही कारणास्तव ती या कार्यक्रमात सहभागी होऊ शकली नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com