करिअरनामा ऑनलाईन । सरकारी बँकेत करिअर करण्याची (IBPS Exam) इच्छा असेल तर मग ही संधी तुमच्यासाठीच चालून आली आहे असं समजा. आयबीपीएस आरआरबी ही बँकिंग कर्मचारी निवड संस्थेद्वारे आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्तरावरची एक बँकिंग परीक्षा आहे. क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये ज्यांना काम करायचे असेल, त्यांच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा पास केल्यास तुमची सगळी स्वप्ने साकार होतात. निवड झाल्यानंतर उमेदवाराला विविध पदांसाठी वेगवेगळे वेतन देण्यात येते.
कशी असते बँकिंग परीक्षा
बँकेतील नोकरीसाठी IBPS बँकिंग परीक्षा आयोजीत केली जाते. ग्रुप A, ग्रुप B, IBPS कार्यालयीन सहायक पदासाठी भरती प्रक्रिया आणि परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. IBPS RRB परीक्षा (IBPS Exam) वर्षातून एकदा आयोजीत केली जाते. जर तुम्ही IBPS RRB अंतर्गत येणाऱ्या पदांवर नोकरी करु इच्छित असाल तर मग उशीर न करता तयारी करा आणि परीक्षा पास व्हा.
भरघोस पगार अन् अमाप भत्ते (IBPS Exam)
IBPS RRB भरती प्रक्रियेत ऑफिसर स्केल I (PO), ऑफिसर स्केल- II ( सामान्य आणि विशेषज्ञ) आणि IBPS RRB बहुउद्देशीय कार्यालय सहाय्यक (लिपिक) पदांचा आंतर्भाव आहे. IBPS RRB वेतनासोबतच उमेदवाराला अनेक लाभ आणि अनुषांगिक भत्ते मिळतात.
किती मिळतो पगार
IBPS RRB अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवाराला विविध पदांसाठी वेगवेगळे वेतन देण्यात येते. पदानुसार हे वेतन असते. जबाबदारीनुसार वेतनासह उमेदवारांना अनुषांगिक लाभही देण्यात येतात.
मिळणारे भत्ते आणि इतर लाभ
1. महागाई भत्ता (DA) – केंद्र सरकारकडून बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना IBPS RRB PO वा लिपिकाला मुळ वेतनावर 46.5% इतका महागाई भत्ता मिळतो. डीएमध्ये दर 3 महिन्यानंतर बदल होतो.
2. हाऊस रेंट अलाउंस (HRA) – HRA कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराचे भाडे भरण्यासाठी भत्ता देण्यात येतो. शहरानुसार, या भत्त्यात वाढ होते. प्रत्येक ठिकाणचा HRA स्वतंत्र (IBPS Exam) असतो. ग्रामीण क्षेत्रात मुळ वेतनाच्या 5% एचआरए मिळतो. निमशहरी भागातील कर्मचाऱ्याला मुळ वेतनावर 7.5% भत्ता, शहरी भागातील कर्मचाऱ्याला मुळ वेतनावर 10% एचआरए मिळतो
3. विशेष भत्ता (SA) – विशेष भत्ता मुळ वेतनाच्या 7.75% मिळतो. SA पूर्वी देण्यात येत नव्हता. जानेवारी 2016 पासून तो लागू करण्यात आला आहे.
अन्य भत्ते
IBPS RRB प्रथमश्रेणी अधिकारी आणि कार्यालयीन सहायक यांना पुढील भत्ते मिळतात
1. प्रवास भत्ता
2. निवासी भाडे (IBPS Exam)
3. न्यूज पेपर रिम्बर्समेंट
4. मेडिकल पॉलिसी
5. नवीन निवृत्ती योजनेचा लाभ
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com