करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10वी च्या जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये (SSC Re Exam) होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या बुधवारी दि. 7 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
10वीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार (SSC Re Exam) योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे.
10वीच्या मार्च 2023 मधील परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. पहिल्यांदा परीक्षा देणाऱ्या आणि (SSC Re Exam) श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2023 आणि मार्च 2024 अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहणार आहेत. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.
काही महत्वाच्या तारखा –
1.माध्यमिक शाळांमार्फत अर्ज भरण्यासाठी मुदत : 7 ते 16 जून (नियमित शुल्कासह) आणि 17 ते 21 जून (विलंब शुल्कासह)
2. माध्यमिक शाळांनी (SSC Re Exam) बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याचा कालावधी : 8 ते 22 जून
3. माध्यमिक शाळांनी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे देणे : 23 जून
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com