IAS Story : IAS होवून आई-वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण; बिझनेससाठी सोडली नोकरी; कमावलं भरपूर नाव आणि पैसा 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आज सरकारी नोकरी मिळवण्यासाठी (IAS Story) तरुण वर्ग जीवतोड मेहनत करताना दिसतात. सरकारी नोकरीच्या मागे धावणाऱ्या अनेकांनी तगड्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्वप्नाच्या मागे धावताना हे तरुण अहोरात्र मेहनत घेतात. काहींना यामध्ये यश मिळते तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. अशाच एका मुलाने आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSC चा अभ्यास सुरु केला आणि विशेष म्हणजे त्यांना यामध्ये भरघोस यश मिळालं अन् ते IAS ऑफिसर झाले. पण नोकरीच्या 6 वर्षातच त्यांनी IAS पदाचा राजिनामा देत बिझनेस करायचं ठरवलं. पाहूया या तरुणाला व्यवसायात किती आणि कसं यश मिळालं…
अचानक घेतला नोकरी सोडण्याचा निर्णय
बालगोपाळ चंद्रशेखर यांचा जन्म केरळमध्ये  झाला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरु केली. 1976 मध्ये ते ही परीक्षा पास झाले. त्यानंतर ते (IAS Story) ट्रेनिंगसाठी मणिपूरला गेले. ते 1977 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. मुलाच्या या कामगिरीवर त्याचे आई-वडील बेहद खुष होते. चंद्रशेखर उत्तम पद्धतीने IAS पद भूषवत असताना त्यांनी अचानकपणे 1983  मध्ये सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या पदाचा देत त्यांनी खाजगी क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं ठरवलं.

बायोमेडिकल उपकरण निर्माण करणाऱ्या कंपनीची स्थापना (IAS Story)
बालगोपाळ चंद्रशेखर यांनी भाई सी पद्मकुमार यांच्यासोबत बायोमेडिकल उपकरण निर्माण करणारी कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. Terumo Penpol या नावाने त्यांनी कंपनीही सुरु केली. त्यांनी ही कंपनी सुरु करण्यापूर्वी  तिरुवनंतपुरम येथील श्री चित्रा तिरुनल इंस्टीट्यूट फॉर (IAS Story) मेडिकल साइंसेज एंड टेक्नोलॉजीला भेट दिली होती. या संस्थेचे काम बघून ते प्रेरित झाले आणि आपणही असं काही तरी करु शकतो; या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरु केली. यासाठी त्यांनी भरतातील सर्वोच्च अशा IAS पदाचा राजिनामा दिला.

देशातील सर्वात मोठी रक्त पिशवी उत्पादक कंपनी
बालगोपाल चंद्रशेखर यांच्या पेनपोल कंपनीने 1987 मध्ये 1 कोटी रुपये खर्चून रक्ताच्या पिशव्या उत्पादन करण्यास सुरुवात केली. चंद्रशेखर यांनी 1999 मध्ये जपानी (IAS Story) कंपनी Terumo सोबत संयुक्त उपक्रम करून या कंपनीला नवीन उंचीवर नेवून पोहचवले. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी रक्त पिशवी उत्पादक कंपनी समजली जाते.
बिझनेसमधून घेतली रिटायर्डमेंट
चंद्रशेखर यांनी 2012 मध्ये आपला कंपनीतील हिस्सा (IAS Story) एका जपानी भागीदाराला विकला. तसेच 26 वर्षांच्या यशस्वी व्यावसायिक कारकीर्दीतून ते निवृत्त झाले. 2015 ते 2021 दरम्यान बालगोपाल चंद्रशेखर यांनी फेडरल बँकेत अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून काम केले आहे .
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com