करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (HSC Results 2023) शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले विषयनिहाय गुण संकेतस्थळावर दिसणार असून त्या माहितीची प्रत घेता येणार आहे. www.mahresult.nic.in संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध असणार आहे.
12वीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयांच्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बारावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी आणि गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, असे (HSC Results 2023) राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले आहे.
काही महत्वाच्या तारखा –
गुण पडताळणी – २६ मे ते ५ जूनपर्यंत
छायाप्रतीसाठी – २६ मे ते १४ जूनपर्यंत
गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्र वितरण : ५ जून
येथे पहा निकाल – (HSC Results 2023)
mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com