करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (Power of IAS & IPS) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची IAS, IPS, IES किंवा IFS सारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते. मात्र, या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती आयएएस आणि आयपीएसची. आयएएस आणि आयपीएस एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही पदांची स्वतःची खास प्रतिष्ठा आहे. त्यापैकी एक साधा वेशातील अधिकारी आहे तर दुसरा पोलिसांच्या गणवेशातील जनतेची सेवा करणारा सेवक आहे.
अशी होते IAS-IPS अधिकाऱ्यांची निवड (Power of IAS & IPS)
IAS आणि IPSची निवड यूपीएससी परीक्षेच्या निकालाच्या आधारे केली जाते. IAS, IPS किंवा IFS रँक मिळणं हे उमेदवाराच्या रँकिंगवर आधारित आहे. परिक्षेत टॉप रँक मिळालेल्या उमेदवारांना IAS पद मिळते, परंतु बर्याच वेळा टॉप रँक मिळवणाऱ्यांची पसंती IPS किंवा IFS असते, तर कमी रँक असलेल्यांनाही आयएएस पद मिळू शकते.
IAS आणि IPS ट्रेनिंग
या परीक्षेत निवडलेले उमेदवार लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसूरी येथे पायाभूत प्रशिक्षण घेतात. प्रत्येकाला इथे 3 महिने प्रशिक्षण दिले जाते. या कोर्समध्ये मुलभूत प्रशासकीय कौशल्ये शिकवली जातात, जी प्रत्येक नागरी सेवा अधिकाऱ्याला (Power of IAS & IPS) माहित असणे आवश्यक आहे. 3 महिन्यांनंतर IAS आणि IPS च्या प्रशिक्षणात खूप फरक पडतो. यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) येथे पाठवले जाते, जिथे त्यांना पोलीस प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात IPS यांना घोडेस्वारी, परेड आणि शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते; तर IAS त्यांचे प्रशिक्षण मसुरीतच पूर्ण करतात. त्यानंतर दोघांचे व्यावसायिक प्रशिक्षण सुरू होते आणि यामध्ये प्रशासन, कायदा-सुव्यवस्था अशा प्रत्येक क्षेत्राची माहिती दिली जाते.
IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये विशिष्ट क्षेत्र आणि विभागाचे प्रशासन समाविष्ट असते. त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्राच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आणि सरकारी धोरणांची अंमलबजावणी करण्याचे तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार (Power of IAS & IPS) देण्यात आले आहेत. IPS अधिकाऱ्यांना गुन्ह्याचा तपास करायचा असतो. तसेच त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था रखायची असते. IAS अधिकाऱ्यांना ड्रेस कोड नसतो आणि ते फॉर्मल ड्रेसमध्ये राहतात. तर IPS अधिकारी ड्युटीवर असताना गणवेश घालतात. एका आयएएस अधिकाऱ्याला पदानुसार अंगरक्षक मिळतात, तर संपूर्ण पोलीस दल आयपीएसच्या आदेशावर चालते.
दोघांच्या जबाबदाऱ्या आणि ताकद
दोन्ही सेवांचे जॉब प्रोफाइल खूप शक्तिशाली आहेत; पण जिल्ह्याचा दंडाधिकारी म्हणून एक IAS अधिक शक्तिशाली आहे. दुसरीकडे, IPSकडे फक्त त्याच्या विभागाची जबाबदारी असते. जिल्ह्यातील सर्व विभागांची जबाबदारी आयएसकडे आहे. जिल्हा अधिकारी म्हणून ते पोलीस विभाग तसेच (Power of IAS & IPS) इतर विभागांचे प्रमुख आहेत. जिल्ह्याच्या पोलिस यंत्रणेची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. शहरातील कर्फ्यू, कलम 144 इत्यादी कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित सर्व निर्णय District Magistrate म्हणजेच DM घेतात. जमावावर कारवाई करणे किंवा गोळीबार करणे असे आदेशही DM देऊ शकतात. तर IPS असे आदेश देऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीही DMची परवानगी आवश्यक असते.
टॉप पोस्ट (Power of IAS & IPS)
आयएएस म्हणून, सचिव हे सर्वोच्च पद आहे. हे भारतातील सर्वोच्च पद आहे ज्यावर फक्त IAS अधिकारी नियुक्त केला जाऊ शकतो. राज्यातही सर्वोच्च पद हे मुख्य सचिवांचे आहे, जे IAS आहेत. तर एक IPS त्याच्या राज्याचा DG होऊ शकतो. आयपीएस अधिकारी केंद्र सरकारमध्ये CBI, IB आणि RAW चा संचालक होऊ शकतो. यासोबतच त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरही नियुक्ती होऊ शकते.
IAS आणि IPS मध्ये शक्तिशाली कोण?
IAS आणि IPS च्या जबाबदाऱ्या आणि अधिकार पूर्णपणे भिन्न आहेत. IAS अधिकारी कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (Power of IAS & IPS) मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जातात. तर IPS वर केंद्रीय गृह मंत्रालयाचे नियंत्रण असते. IAS अधिकाऱ्याचा पगार हा IPS अधिकाऱ्यापेक्षा तुलनेने जास्त असतो. तसेच, एखाद्या प्रदेशात फक्त एकच IAS अधिकारी असतो तर एखाद्या प्रदेशात IPS अधिकाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार असते. एकूणच, वेतन आणि अधिकाराच्या बाबतीत IASअधिकाऱ्याचा दर्जा IPS अधिकाऱ्यापेक्षा चांगला असतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com