करिअरनामा ऑनलाईन । पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ (Vocational Course) हलवाई गणपती हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. या ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. या ट्रस्टच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्यासाठी खास कोर्स सुरू करण्यात आला आहे. त्याचा फायदा पुणे तसंच परिसरातील तरुणांना होणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि (Vocational Course) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. ट्रस्टने माफक दरात अल्प मुदतीचे रेफ्रीजरेशन, वॉशिंगमशिन, एअरकंडिशनिंग प्रशिक्षण कोर्सचे आयोजन केलं आहे.
कोर्ससाठी आवश्यक पात्रता – (Vocational Course)
रेफ्रिजरेटर, वॉशिंगमशीन, एअरकंडीशन प्रशिक्षण कोर्ससाठी विद्यार्थी हा 10 वी पास किंवा 12 वीची परीक्षा दिलेला असावा. तो 12वीमध्ये पास किंवा नापास असला तरीही चालेल.
वय मर्यादा – या प्रशिक्षणाची वय मर्यादा 18 ते 35 वर्षे आहे.
कोर्स कालावधी – 90 दिवस
कोर्स फी – 400/- रुपये
आवश्यक कागदपत्रे – (Vocational Course)
1. आधार कार्डाची झेरॉक्स
2. 10 वी किंवा त्यापूढील कोणत्याही शिक्षणाचे मार्कशीट आवश्यक.
प्रशिक्षणाचे ठिकाण – गणपती सदन, पहिला मजला, 132 बुधवार पेठ, दगडूशेठ गणपती मंदिरामागे, पुणे – 411002
संपर्क क्र. – (020) 24492000/ 24498989
या प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया (Vocational Course) सुरु असून प्रथम येणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा; असं आवाहन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने केलं आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com