करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न : इंग्रज त्यांच्या नावापुढे लॉर्ड का लावतात?
उत्तर : लॉर्ड हा समिती युगाचा शब्द आहे. ज्याचा अर्थ मालक, स्वामी असा होतो. इंग्लंडमध्ये हा आदराचा शब्द आहे, म्हणून लोक त्याचा वापर करतात. (GK Updates)
प्रश्न : देशाचे पहिले महाधिवक्ता कोण आहेत?
उत्तर : एम.सी. सेतलवाड (M. C. Setalvad)
प्रश्न : वकील नेहमी काळा कोट का घालतात?
उत्तर : काळ्या रंगाचा कोट शिस्त आणि आत्मविश्वास दर्शवतो
प्रश्न : अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिलेचे नाव काय आहे?
उत्तर : व्हॅलेंटिना तेरेश्कोवा (Valentina Tereshkova)
प्रश्न : आपल्या देशाच्या पहिल्या संरक्षण मंत्र्याचे नाव काय?
उत्तर : सरदार बलदेव सिंह (Sardar Baldev Singh)
प्रश्न : कोणत्या ग्रहावर सर्वाधिक चंद्र आहेत?
उत्तर : गुरू ग्रह (Jupiter)
प्रश्न : देशातील लोकसभेचे पहिले सभापती? (GK Updates)
उत्तर : जी. व्ही. मावळंकर (G. V. Mavalankar)
प्रश्न : आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru)
प्रश्न : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर : प्रतिभा पाटील (Pratibha Patil)
प्रश्न : मानवी शरीराचा कोणता भाग दर दोन महिन्यांनी बदलतो?
उत्तर : भुवया (Eye Brow)
प्रश्न : झिरो बजेट नैसर्गिक शेती (Natural Farming) म्हणजे काय?
उत्तर : कृषी क्षेत्रातील ही एक नवीन पद्धत आहे. त्याचा (GK Updates) उद्देश शेतीमध्ये नैसर्गिक गोष्टींचा वापर करणं हा आहे आणि यासाठी खूपच कमी बजेट किंवा शून्य रुपयांचा खर्च येतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com