CBSE Board Exam Results : CBSE 10वी/12वी परीक्षेचा निकाल एकाच दिवशी लागणार? असा पहा निकाल…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Board Exam Results) एकाच दिवशी, काही तासांच्या अंतराने 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. परीक्षेचे निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत साईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर प्रसिद्ध केले जातील. या अधिकृत वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र यांसारखे तपशील नोंद करावे लागतील.
CBSEच्या 10वी, 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. यंदा दहावीच्या परीक्षा 21 मार्चला संपल्या. तर बारावीची परीक्षा 5 एप्रिलपर्यंत (CBSE Board Exam Results) चालली होती. यावर्षी 10 वी आणि 12 वीचे एकूण 38,83,710 पात्र विद्यार्थी होते. त्यामध्ये 10 वीचे 21,86,940 आणि 12 वीचे सुमारे 16,96,770 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

कधी जाहीर होणार निकाल? (CBSE Board Exam Results)
सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर निकालाची तारीख आणि वेळ सध्या जाहीर केलेली नाही. परंतु सीबीएसईच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत निकाल जाहीर होतील. परीक्षेचा निकाल जाहीर करण्याच्या तारखा CBSE द्वारे त्यांच्या अधिकृत वेबसाइट, ट्विटर हँडल आणि इतर सोशल मीडियावरुन जाहीर केल्या जातील.
कसा पहायचा निकाल?
विद्यार्थी त्यांचे निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर पाहू शकतात. तसेच CBSE चे निकाल डिजिलॉकरवर देखील उपलब्ध (CBSE Board Exam Results) असतील. निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र आवश्यक असेल. याशिवाय इतर कोणत्याही माहितीसाठी विद्यार्थी अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

दहावीची 76 विषयांसाठी तर बारावीची 115 विषयांसाठी झाली परीक्षा
सीबीएसईने यंदा इयत्ता दहावीची परीक्षा 76 विषयांसाठी घेतली आणि इयत्ता बारावीची परीक्षा एकूण 115 विषयांसाठी घेतली. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 7240 केंद्रे (CBSE Board Exam Results) स्थापन करण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले होते. तर बारावीच्या परीक्षेसाठी 6759 केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com