Success Story : सरपंचाची लेक झाली पायलट!! सृष्टी उडवणार विमान; स्पेशल ट्रेनिंगसाठी जाणार स्पेनला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील (Success Story) सृष्टी वर्मा ही मुलगी विमान उडवणार असून ती पहिली व्यावसायिक पायलट बनली आहे. सृष्टीने रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीतून दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतरच ती व्यावसायिक पायलट बनली आहे. सृष्टी पायलट झाल्यामुळे तीच्या कुटुंबात आणि गावात आनंदाचे वातावरण आहे.
लहानपणीच पाहिलं स्वप्न
मुझफ्फरपूर पोसचे माजी सरपंच कै. शिवकुमार वर्मा हे सृष्टीचे वडील. त्यांचा मुलगा कौशल वर्मा हा एका खासगी विमा कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नोकरीनिमित्त (Success Story) तो काही वर्षांपूर्वी दिल्लीला शिफ्ट झाला आणि आता तो मुंबईत राहतो. सृष्टी वर्मा सांगते की; ती तिच्या वडिलांना नोकरीमुळे बऱ्याचवेळा विमानात प्रवास करताना पाहायची. त्यामुळे तिने लहानपणीच पायलट होण्याचे स्वप्न पहिले आणि त्या दिशेने तिने पाऊल टाकण्यास सुरवात केली.

स्पेशल ट्रेनिंगसाठी जाणार स्पेनला
व्यावसायिक पायलट लायसन्स कोर्स पूर्ण करण्यासाठी सृष्टी दोन वर्षांपूर्वी प्रवेश परीक्षेला बसली होती. ज्यामध्ये प्रथम लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी होती. यामध्ये सृष्टीने 27 वा क्रमांक (Success Story) मिळवला आणि सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमी, रायबरेलीमध्ये स्थान मिळवले. जिथे दोन वर्षांच्या शिक्षणानंतर ती व्यावसायिक पायलट बनली आहे. सृष्टी पायलट होताच तिला अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर आल्या. पण ती आता स्पेशालिस्ट ट्रेनिंगसाठी दोन महिन्यांसाठी स्पेनला जाणार आहे.
‘मुलींनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे’ (Success Story)
सृष्टी सांगते की, मुली कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत. मुलीही विमान उडवू शकतात आणि प्रत्येकाने काहीतरी वेगळे क्षेत्र निवडले पाहिजे. ती म्हणते; “एकच ध्येय ठेवा (Success Story) आणि त्या ध्येयाला स्पर्श करण्यासाठी कठोर परिश्रम करा. त्यानंतर तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण झाले नाही असे कधीच होऊ शकत नाही.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com