करिअरनामा ऑनलाईन । बॉलिवूडचा सुपरहिट (Actor Success Story) चित्रपट ‘ओम शांती ओम’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदे याचा आज वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटांमधून या अभिनेत्याने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खूप गुदगुल्या केल्या आहेत. श्रेयस मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहे. श्रेयस हा मराठी चित्रपट उद्योगातील अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये यश संपादन केले आहे. आज आपण श्रेयसच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया…
दिग्दर्शन…प्रॉडक्शन…व्हॉईस ओव्हर
श्रेयस तळपदे 20 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. दिग्दर्शनापासून ते प्रॉडक्शन आणि व्हॉईस ओव्हरपर्यंत त्याने प्रत्येक क्षेत्रात कमांड घेतली आहे. कोणताही (Actor Success Story) गॉडफादर किंवा फिल्मी कनेक्शन न ठेवता स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या श्रेयसची कथा खूप प्रेरणादायी आहे.
नाटकातून अभिनयाची छाप पाडली (Actor Success Story)
श्रेयसचा जन्म 27 जानेवारी 1976 रोजी मुंबईत झाला. कॉलेजमध्येच त्यांनी थिएटर करायला सुरुवात केली. त्याचा अभिनय पाहून त्याला मराठी मालिकांमध्ये काम मिळू लागले. मराठी मालिकांमध्ये काम करण्यासोबतच तो मराठी नाटकातही काम करायचा. अभिनेता श्रेयस तळपदेने ओम शांती ओम, गोलमाल सिरीज, वाह ताज आणि इक्बाल यांसारखे हिंदी चित्रपट आणि मराठी भाषेत 45 चित्रपट केले आहेत .
‘इकबाल’ ने केले स्टार
श्रेयसने चित्रपट दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांच्या बहुचर्चित आणि पुरस्कार विजेत्या ‘इकबाल’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. इक्बाल या (Actor Success Story) चित्रपटातील श्रेयसच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि त्याला मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या.
सँडविच घ्यायला पैसे नव्हते
मिडियाशी संवाद साधताना श्रेयस तळपदेने आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून दिली आणि सांगितले की, त्याने त्याच्या कारकिर्दीत कधीही करण जोहर किंवा यशराजच्या चित्रपटात काम केले नाही. पण याचा अर्थ असा नाही की तो सक्षम अभिनेता नाही. श्रेयस तळपदेच्या आयुष्यात (Actor Success Story) एक वेळ अशी आली जेव्हा त्याच्याकडे सँडविच घेण्यासही पैसे नव्हते किंवा घराचे भाडे भरायलाही पैसे नव्हते. तसेच बसने स्टुडिओला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे. मेहनत आणि संघर्ष करून त्याने खूप नाव कमावले. आज तो करोडोंची कमाई करत आहे.
अलीकडेच श्रेयसने प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटासाठी हिंदीत डबिंग केले आहे. यापूर्वी त्याने ‘द लायन किंग’च्या हिंदी आवृत्तीत हॉलिवूड (Actor Success Story) अभिनेता बिली आयचनरच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला होता.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com