UPSC Success Story : IITian झाली IPS आणि नंतर IAS, गरिमा अग्रवालला इतकं यश कसं मिळालं? जाणून घ्या…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय प्रशासकीय सेवा विभाग हा देशाच्या (UPSC Success Story) नोकरशाहीमध्ये सर्वात प्रभावशाली मानला जातो. यामध्ये, उमेदवार विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सचिव दर्जाची पदे मिळवतात, तर जिल्हा स्तरावर ते विविध प्राधिकरणांमध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि आयुक्तांची पदे व्यापतात. यामुळेच दरवर्षी लाखो युवक संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत नशीब आजमावताना दिसतात. मात्र, प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. पण असे काही प्रयत्नवादी असतात जे पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करतात.
अशीच एक आश्वासक भारतीय प्रशासकीय अधिकारी आहे; ती म्हणजे गरिमा अग्रवाल. मध्य प्रदेशातील खरगोन येथील 29 वर्षीय गरिमाने पहिल्याच प्रयत्नात UPSC पास होवून IPS पद मिळवले होते, पण तिचे ध्येय काही वेगळेच होते. तिने पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले. जाणून घेऊया IAS गरिमाची यशोगाथा…

UPSC Success Story Garima Agarwal IAS

लहानपणापासूनच हुशार
सरस्वती विद्या मंदिर, खरगोन येथून गरिमा यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले आहे. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. गरिमा यांनी शालेय जीवनापासून ते (UPSC Success Story) यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसपर्यंत ज्या ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले त्यात त्यांनी नेहमी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. त्यांची मोठी बहीण प्रीती अग्रवाल यांनी 2013 मध्ये भारतीय टपाल सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती.

 

UPSC Success Story Garima Agarwal IAS

IITian ते IPS आणि नंतर IAS (UPSC Success Story)
गरिमा UPSC CSE परीक्षेत 240 वा क्रमांक मिळवून पहिल्याच प्रयत्नात IPS अधिकारी बनल्या. लगेच पुढच्याच प्रयत्नात 2018 मध्ये CSE परीक्षेत त्यांनी कठोर प्रयत्न करून संपूर्ण भरतातून 40 वी रँक तर मिळवत IAS होण्याचे स्वप्नही पूर्ण केले. विशेष म्हणजे UPSC देण्यापूर्वी गरिमा यांनी आयआयटी हैदराबादमधून पदवी प्राप्त केली आहे.

UPSC Success Story Garima Agarwal IAS

गरिमा यांनी दिल्या अभ्यासाच्या टिप्स
गरिमा यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांना अभ्यासाच्या टिप्स दिल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा की प्राथमिक (UPSC Success Story) परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी स्वतंत्रपणे न करता एकत्रितपणे करणं फायद्याचं ठरतं.
गरिमायांच्या मते, अनेक वेळा यूपीएससी पूर्व परीक्षेत येणारे प्रश्न मुख्य परीक्षेतही येतात. म्हणूनच पुनरावृत्ती आवश्यक आहे. केवळ भरपूर अभ्यास साहित्य गोळा करून यश मिळत नाही तर ते वाचावे लागते आणि वाचलेले लक्षात ठेवावे लागते. तसेच मॉक टेस्ट देवून उत्तर लेखनाचा (UPSC Success Story) सराव वाढवा. मॉक टेस्टद्वारे तुमची पुनरावृत्ती तपासत राहा. इंटरनेटवर अभ्यासाचे भरपूर साहित्य उपलब्ध आहे. गरिमाच्या म्हणण्यानुसार, ज्या विषयात मला कमी गुण मिळाले त्या विषयांसाठी मी स्वतंत्रपणे सराव करायचे आणि त्यांची उजळणी करायचे.

UPSC Success Story Garima Agarwal IAS

‘निराश होऊ नका; धीर धरा’
नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रोत्साहन देताना गरिमा सांगतात की; “या परीक्षेत यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि चिकाटी. तुमची मानसिक स्थिति अशा प्रकारे तयार करा की ज्या दिवशी तुम्हाला वाचावेसे वाटणार नाही त्याच (UPSC Success Story) दिवशी चांगल्या पद्धतीने वाचन करा आणि तुमच्यात नवीन धैर्य कसे निर्माण होते ते पहा. ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अशा लोकांच्या संपर्कात रहा. नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहणेच चांगले. अपयश किंवा यश दोन्ही आपल्या मनात असते, जिद्द असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com