करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे UPSC परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत यूपीएससीची परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. युपीएससी परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSCच्या मुलाखतीत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
1. जिल्हा गॅझेटियर म्हणजे काय?
उत्तर :- हा अहवाल इंग्रजांच्या काळात दरवर्षी तयार केला जायचा. त्यात संपूर्ण जिल्ह्याचे रेकॉर्ड ठेवले जायचे.
2. रोबोटिक्सचे भविष्य काय आहे? अशी वेळ येईल का जेव्हा रोबोट माणसांची जागा घेतील?
उत्तर :- (GK Updates) रोबोटिक्स आणि माणसाचे विचार ह्यात भावनिक फरक आहे. मानवाने रोबोट बनवले आहेत. भावना आणि चैतन्य अजूनही रोबोटमध्ये आलेले नाही आणि ते येणे कठीण आहे. रोबोट्सनी माणसांची जागा घेणे अवघड आहे.
3. वायसरायच्या पत्नीच्या नावावर कोणत्या रुग्णालयाचे नाव आहे?
उत्तर :- इतिहासाचा हा प्रश्न आयएएसच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. उत्तर देताना उमेदवाराने सांगितले की, हे रुग्णालय मध्य भारतच्या व्हाईसरॉयच्या पत्नी एल्गिन यांच्या (GK Updates) नावावर बांधले गेले आहे. आता ते राणी दुर्गावती हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. जबलपूरमधील हे पहिले रुग्णालय आहे.
4. कोणता प्राणी जखमी झाल्यावर माणसांसारखा रडतो?
उत्तर :- अस्वल.
5. सूर्यकिरणांमध्ये किती रंग असतात?
उत्तर :– सूर्यकिरणांमध्ये 7 रंग असतात (वांगी रंग , जांभळा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी आणि लाल)
6. जर एखाद्या मुलाने मुलीला प्रपोज केले तर प्रपोज करणे गुन्हा ठरेल का?
उत्तर :- IPC च्या कोणत्याही कलमात प्रस्ताव मांडणे गुन्हा म्हणून वर्गीकृत केलेले नाही.
7. अकबराच्या नऊ रत्नांची नावे सांगा? (GK Updates)
उत्तर :- 1. राजा बिरबल, 2. मियां तानसेन, 3. अबुल फजल, 4. राजा मानसिंग, 5. राजा तोडर मल, 6. मुल्ला दो प्याजा, 7. फकीर अझुद्दीन, 8. अब्दुल रहीम खान-ए-खाना, 9. फकीर अजियोद्दीन .
8. स्नायूंमध्ये कोणते आम्ल साचल्याने थकवा येतो?
उत्तर :- लॅक्टिक ऍसिड.
9. वकील फक्त काळा कोट का घालतात?
उत्तर :- काळा कोट शिस्त आणि आत्मविश्वास दर्शवतो.
10. एखाद्या मुलाला ऑफिसमध्ये तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा असेल तर तुम्ही काय कराल?
उत्तर :- या प्रश्नावर महिला उमेदवाराने सांगितले की, त्या उमेदवाराला प्रशिक्षणात वेगवेगळ्या परिस्थितीत कसे वागायचे हे शिकवले जाईल. (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com