GK Updates : बॉलीवूड इंडस्ट्रीची स्थापना केव्हा झाली? ‘हे’ प्रश्न मुलाखतीत विचारले जावू शकतात

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे…

प्रश्न : बॉलीवूड इंडस्ट्रीची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर : 1930 मध्ये बॉलीवूडची स्थापना झाली, यानंतर 1934 मध्ये हिमांशू राय यांनी सुरू केलेल्या बॉम्बे टॉकीजमध्ये (Bombay Talkies) भारतीय सिनेमाच्या विकासाला वेग आला.

प्रश्न : सूर्य सर्वात आधी कुठे उगवतो अन् कुठे मावळतो ?
उत्तर : नॉर्वेला (Norway) मावळत्या सूर्याचा देश म्हणतात कारण, तिथे सूर्य सर्वात आधी नॉर्वेत मावळतो. तर सर्वात आधी सूर्य उगवतो तो देश म्हणजे जपान होय. (GK Updates)

प्रश्न : IQ चा फुल फॉर्म आणि त्याचा अर्थ काय आहे ?
उत्तर : IQ चे फुल फॉर्म म्हणजे Intelligence Quotient.(IQ) ही बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध प्रमाणित टेस्टिंगमधून काढलेली गणना आहे. ‘IQ’ हा शब्द जर्मन शब्द Intelligenz-Quotient पासून आला आहे, 1912 मध्ये जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 20 व्या शतकाच्या सुरूवातीस आधुनिक मुलांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या पद्धतींसाठी प्रथम वापरला. परंतु आजही ‘IQ’ हा शब्द अजूनही जगभरात सगळीकडे वापरला जातो.

प्रश्न : एक लीटरमध्ये हेलिकॉप्टर नेमकं किती मायलेज देतं? (GK Updates)
उत्तर : हेलिकॉप्टर एका तासात 50 लिटर ते 60 लिटर इंधन वापरते. आणि एक मैल उडण्यासाठी 1 गॅलन इंधन लागतं. त्याची सरासरी काढण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वेग ताशी 180 किलोमीटर मानला, तर हेलिकॉप्टर 1 लिटर इंधनात 3 ते ४ किलोमीटर उडू शकतं.

प्रश्न : भारतात पहिला कोरोना रुग्ण कधी आढळला ?
उत्तर : 30 जानेवारी 2020 (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com