करिअरनामा ऑनलाईन । रस्त्यावर तुम्ही दुचाकी, तीन चाकी, चार चाकी एवढच (GK Updates) नव्हे तर उंच उडणाऱ्या विमानाची चाके पाहिली असतील. पण सर्व वाहनांचे टायर नेहमी काळे का असतात हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? लहान कार असो वा मोठा ट्रक, सर्व प्रकारच्या वाहनांचे टायर काळेच असतात. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर यामागील विज्ञान आज आपण जाणून घेऊया.
काय आहे वैज्ञानिक कारण (GK Updates)
तुम्हाला माहित असेलच की, कारचे टायर रबराचे असतात. रबराचा रंग राखाडी असला तरी रबर टायर बनवण्याच्या प्रक्रियेत त्याचा रंग काळा होतो.
काळे टायर जास्त काळ टिकतात, त्यामुळे टायरचा रंग काळा असतो. वास्तविक, टायर बनवण्यासाठी रबरमध्ये ब्लॅक कार्बन (black carbon) आणि सल्फर (sulphur) मिसळले जातात. यामुळे (GK Updates) टायरचा रंग काळा होतो.
नैसर्गिक रबर खूप मऊ आहे. टायर बनवण्यासाठी ते कडक केले जाते. कार्बन आणि सल्फर फक्त कडक करण्यासाठी त्यात मिसळले जाते. यामुळेच टायरचा रंग काळा असतो.
जर रबरमध्ये कार्बन आणि सल्फर मिसळले नाही, तर त्यापासून बनवलेले टायर अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतील. त्याच वेळी, कमी वापरामुळे हे टायर झिजतात आणि (GK Updates) खराब होतात. यामुळेच टायर रंगीत नसून काळ्या रंगाचे असतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com