करिअरनामा ऑनलाईन । राधा वेंबू या भारतीय महिलेची संपत्ती 21,000 कोटी (Forbes Richest Women) रुपये आहे असं सांगितल्यास तुम्हाला खरं वाटणं थोडं अवघडच आहे. पण ही गोष्ट खरी आहे. राधा वेम्बू या सध्या भारतामधील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. खांद्यावर अडकवलेली पर्स, हलक्या रंगाची साडी आणि कपाळावर लावलेली टिकली अशा पेहरावात त्यांना पाहिल्यास कोणीही म्हणेल की ही एखादी सर्वसाधारण महिला आहे. पण सत्य काही वेगळेच आहे. स्वत: संपत्ती कमवलेल्या म्हणजेच सेल्फ मेड माहिलांच्या यादीमध्ये राधा या तिसऱ्या स्थानी आहेत. पूर्वी या स्थानावर किरन मुझूमदार-शॉ आणि फाल्गुनी नायर यासारख्या महिला होत्या.
जागतिक श्रीमंताच्या यादीत मिळवलं स्थान
राधा यांची एकूण संपत्ती 2.6 कोटीअमेरिकी डॉलर्स म्हणजेच 21 हजार 455 कोटी रुपये इतकी असल्याचा उल्लेख ‘फोर्ब्स’च्या ‘रियल टाइम रिच’च्या यादीत आहे. राधा या जागतिक स्तरावरील श्रीमंतांच्या यादीमध्ये 1176 व्या स्थानी आहेत. राधा यांची झोहो कॉर्प कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक (Forbes Richest Women) असून या हिस्सेदारीचाच त्यांच्या संपत्तीचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. झोहो कॉर्प ही एक खासगी आयटी कंपनी असून ती राधा आणि त्यांच्या भावांनी स्थापन केली होती. या कंपनीमधील सर्वात मोठा वाटा हा राधा यांच्या नावावर आहे.
‘अॅडवेन्टनेट’ नावाने भावांबरोबर स्थापन केली कंपनी
राधा यांचा जन्म 1972 साली झाला. त्यांचे वडील मद्रास हायकोर्टामध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करायचे. त्यांनी आयआयटी मद्रासमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी इंडस्ट्रीयल मॅनेजमेंटपर्यंतचं पदवी शिक्षण आयआयटी मद्रासमधून घेतलं. 1996 साली राधा यांनी त्यांचे (Forbes Richest Women) भाऊ श्रीधर वेम्बू आणि शेखर वेम्बू यांच्या मदतीने अॅडवेन्टनेट नावाने कंपनी सुरु केली. श्रीधर हे या कंपनीचे संस्थापक म्हणून लोकप्रिय आहेत तर शेखर हे पडद्यामागील सर्वात मोठ्या आधारस्तंभांपैकी एक आहेत.
अमेरिकेत आहे तब्बल 375 एकरांवर ऑफिस (Forbes Richest Women)
राधा या स्वत: ‘झोहो मेल्स’च्या प्रोडक्ट मॅनेजर आहेत. त्या 250 जणांची टीम संभाळतात. त्या सध्या चेन्नईमधून काम करतात. झोहोच्या मुख्य कार्यालयांपैकी एक चेन्नईमध्येच आहे. तसेच झोहोचं 375 एकरवर पसरलेलं मुख्यालय अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथे आहे.
Wappला देणार चॅलेंज
झोहो कंपनीचे एकूण युझर्स हे 6 कोटींच्या आसपासून असून जगातील 9 देशांमध्ये याचे युझर्स आहेत. याच कंपनीच्या मालकीची झोनो नावाची कंपनी असून ती क्लाऊड (Forbes Richest Women) बिझनेस सॉफ्टवेअरमध्ये कार्यरत आहे. सध्या ही कंपनी व्हॉट्सअपला आव्हान देणाऱ्या ‘अरत्ताई’ या सॉफ्टवेअरच्या बीटा व्हर्जनची टेस्टींग करत आहे. ‘अरत्ताई’चा तमिळ भाषेतील अर्थ संवाद असा होतो.
या कंपन्यांमध्ये आहेत डायरेक्टर
राधा या जानकी हाय-टेक अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कृषी आधारित एनजीओमध्ये डारेक्टर आहेत. तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील हायलॅण्ड व्हॅली कॉर्पोरेशन प्रायव्हेट (Forbes Richest Women) लिमिटेड या कंपनीमध्येही राधा या डायरेक्टर आहेत. राधा या विवाहीत असून त्यांना एक मुलगा आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com