Agniveer Recruitment : मोठी अपडेट!! अग्निवीर भरती प्रक्रियेत झाले ‘हे’ बदल; जाणून घ्या नवीन नियम

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या (Agniveer Recruitment) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेत आता मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांना आता जुनी भरतीची प्रक्रिया अवलंबता येणार नाही. शिवाय या बदललेल्या भरती प्रक्रियेमध्ये नेमके काय बदल केले आहेत ते पाहूया…

1. सीईई-प्रवेश परीक्षा बंधनकारक

भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेतील नव्या बदलानुसार आता अग्निवीर भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. या नवीन प्रक्रियेची जाहीरात भारतीय सैन्य दलाने (Agniveer Recruitment) जारी केली आहे. त्यामुळे इच्छुकांना अग्निवीर होण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीईई-प्रवेश परीक्षा देणं बंधनकारक असणार आहे.

2. परीक्षेचे 3 टप्पे

अग्निवीर भरती प्रक्रिया आता 3 टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये सीईई, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी असे तीन टप्पे असतील. तर भरती प्रक्रियेचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केला आहे. पहिल्या टप्प्यात सीईई (CEE) प्रवेश परीक्षा होईल. त्यानंतर शारीरिक चाचणी आणि शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी (Medical Test) घेतली जाईल. याबाबतची नवीन अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे.

3. २०० केंद्रांवर होणार CEE परीक्षा

अग्निवीरच्या भरती प्रक्रियेतील नवीन बदलानुसार भरतीसाठीची सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एक तासाचा वेळ (Agniveer Recruitment) देण्यात येईल. परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जावं लागणार आहे. एप्रिल २०२३ मध्ये होणाऱ्या सीईईसाठी २०० परीक्षा केंद्र असणार आहेत. परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जारी केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची फेब्रुवारी २०२३ च्या मध्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

4. अशी होईल शारीरिक चाचणी

सीईई परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढे शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी देऊ शकतील. दुसऱ्या टप्प्यांत होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी महिला आणि पुरुष दोघांसाठीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. तर शारीरिक चाचणीत यशस्वी झालेल्या महिला पुरुष दोन्ही उमेदवार तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी पात्र ठरतील.

5. वैद्यकीय चाचणी

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. यामध्ये सैन्य दलाच्या नियमांनुसार, प्रकृती आणि शारीरिक (Agniveer Recruitment) तंदुरुस्ती योग्य असल्यास उमेदवारांना अग्निवीर बनण्याची संधी मिळणार आहे.

अशी होती जुनी भरती प्रक्रिया

जुन्या भरती प्रक्रियेत सीईई ऐवजी पहिल्यांदा शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जायची आणि शेवटच्या (Agniveer Recruitment) टप्प्यात CEE परीक्षा घेतली जायची.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com