Nirmala Sitharaman : सेल्सगर्ल ते केंद्रीय अर्थमंत्री.. देशाचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या निर्मला सितारमन यांचे शिक्षण पाहून अवाक व्हाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील (Nirmala Sitharaman) मागील सरकारमध्ये संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामण या देशातील पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी १९७०-७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र सीतारामण या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

मोदींच्या पहिल्या कार्यकाळात सीतारामण यांच्याकडे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर (Nirmala Sitharaman) त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देऊन त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला होता. आता मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Nirmala Sitharaman

सर्वसामान्य कुटुंबात झाला जन्म (Nirmala Sitharaman)
१८ ऑगस्ट १९५९ रोजी तामिळनाडूतील सर्वसामान्य कुटुंबात सीतारामण यांचा जन्म झाला होता. तमिळनाडूतील मदुराई येथे नारायणन् सीतारामन् आणि सावित्री या दांपत्त्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते. वडिलांची वारंवार बदली होत असल्याने त्यांना तामिळनाडूतील अनेक ठिकाणी रहावं लागायचं.

 

Nirmala Sitharaman

असा आहे शैक्षणिक प्रवास 
सीतारामण यांनी तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथे शिक्षण घेतलं. त्यांचं पदवी शिक्षण अर्थशास्त्रात झालं. तर नवी दिल्लीच्या जेएनयूमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी इंडो-युरोपियन टेक्स्टाइल ट्रेडमध्ये पीएचडी केली. त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या (Nirmala Sitharaman) माजी विद्यार्थिनी आहेत. २००८मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन वर्षानंतर त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती.

सीतारमन यांनी २००६ साली भाजपा पक्षात प्रवेश केला होता. २०१० साली त्यांनी भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.

Nirmala Sitharaman

अर्थशास्त्रात मिळवली पदवी

महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण (Nirmala Sitharaman) केल्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी जेएनयूमधून अर्थशास्त्रात एमए आणि नंतर एमफिलची पदवी प्राप्त केली आहे.

लंडनमध्ये झाली करिअरची ग्रोथ

निर्मला सीतारामन यांनी लंडनमधील कृषी अभियंता असोसिएशनमध्ये अर्थशास्त्रज्ञ सहाय्यक म्हणून काम केले आहे. लंडनमधील प्राइस वॉटर हाऊसमध्ये त्यांनी वरिष्ठ व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्येही काम केले आहे. भारतात परतल्यानंतर (Nirmala Sitharaman) त्यांनी हैदराबाद येथील सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी स्टडीजमध्ये उपसंचालक म्हणून काम केले. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी PRANAVA नावाच्या शाळाची स्थापन केली होती.

Nirmala Sitharaman

जगातील शक्तिशाली महिला

निर्मला सीतारामन भारताच्या विद्यमान वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून काम करत आहेत. २०१४ पासून त्या भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. सीतारामन यांनी यापूर्वी भारताच्या संरक्षण मंत्री म्हणून काम केले होते, त्यामुळे भारताच्या (Nirmala Sitharaman) दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री बनल्या आणि पहिल्या पूर्ण- त्यावेळच्या महिला अर्थमंत्री. त्यांनी वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभारासह वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.

सीतारामन यांना फोर्ब्स २०२१ च्या जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान देण्यात आले आणि त्यांना ३७ व्या स्थानावर ठेवण्यात आले. फॉर्च्युनने निर्मला सीतारामन यांना भारतातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून स्थान दिले आहे.

सेल्सगर्ल ते अर्थमंत्री

सीतारामन लंडनमध्ये असताना त्यांनी रीजेंट स्ट्रीट लंडनमध्ये असलेल्या होम डेकोर उत्पादनांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम केले. नंतर त्या लंडन येथील कृषी अभियंता (Nirmala Sitharaman) असोसिएशनमध्ये सामील झाल्या आणि एका संस्थेत अर्थशास्त्री अंतर्गत सहाय्यक म्हणून नोकरी मिळवली. पुढे त्यांनी युनायटेड किंगडममधील प्राइसवॉटरहाऊस कूपर्स PwC मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यानंतर, एंटरप्राइझमध्ये उच्च पदावर व्यवस्थापक म्हणून काम करण्यासाठी त्या बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये सामील झाल्या.

Nirmala Sitharaman
वैयक्तिक जीवन, पती आणि मुलगी (Nirmala Sitharaman)

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकत असताना निर्मला सीतारामन यांची पती परकला प्रभाकर यांच्याशी भेट झाली. ते त्यांच्या सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात दाखल झाले होते. त्यानंतर 1986 मध्ये त्यांचे लग्न झाले. प्रभाकर हे राजकीय समालोचक आणि राजकीय (Nirmala Sitharaman) अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करतात. सुरुवातीला ते काँग्रेस पक्षाकडे जोरदार झुकले होते तर सीतारामन यांना भारतीय जनता पक्षाकडे अतुलनीय आकर्षण वाटू लागले होते. कालांतराने ते भाजपशीही जोडले गेले. 2014 ते 2018 या काळात त्यांनी आंध्र प्रदेश सरकारचे दळणवळण सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

Nirmala Sitharaman

या जोडप्याला परकला वांगमयी नावाची मुलगी आहे. ती बहुतेकवेळा मीडियापासून दूर राहते. ती सुरुवातीला तिच्या वडिलांसोबत हैदराबादमध्ये राहायची. सध्या (Nirmala Sitharaman) ती देखील तिच्या पालकांसह भारताच्या राजधानीत राहते. तीने  दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com