GK Updates : भारताच्या नकाशात नेहमी श्रीलंका का? इथे मिळेल उत्तर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शालेय जिवनापासून आपण पाहत आलोय की (GK Updates) भारत आणि श्रीलंका हे दोन्ही स्वतंत्र देश असले तरी भारताच्या नकाशात श्रीलंका देश दाखवला जातो. तर पाकिस्तान आणि चीनचा ही काही भाग भारताच्या नकाशात कापला गेला आहे. भारताच्या नकाशात श्रीलंका देशाचा नकाशा का दाखवला जातो हे आज  आपण समजून घेणार आहोत…

युनायटेड नेशन्सचा कायदा

भारताच्या नकाशात श्रीलंका नेहमीच जोडलेली दिसते. आता प्रश्न असा पडतो की, भारत आणि श्रीलंका हे दोन्ही स्वतंत्र देश असताना भारताच्या नकाशात ही श्रीलंका का दाखवली जाते. तर पाकिस्तान आणि चीनचा ही काही भाग भारताच्या नकाशात कापला गेला आहे. युनायटेड (GK Updates) नेशन्सचा एक कायदा आहे, ज्याला समुद्राचा कायदा म्हणतात. या कायद्यानुसार जर एखाद्या देशाची सीमा समुद्राला लागून असेल तर सीमेपासून 200 सागरी मैल म्हणजेच 370 किलोमीटरचा परिसर हा त्या देशाचा सागरी क्षेत्र मानला जातो. आता श्रीलंका आणि भारत यांच्यातील अंतर केवळ 18 सागरी मैल आहे. त्यामुळेच भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवली जाते.

असा तयार झाला कायदा (GK Updates)

खरं तर 1956 साली युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी (UNCLOS-I) संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केले होते. या परिषदेत अनेक देश सहभागी झाले होते. या चर्चेचा निकाल 1958 मध्ये लागला. परिणामी देशांच्या सागरी हद्दीसंदर्भातील करारांवर कायदे करण्यात आले. मात्र 1973 ते 1982 या काळात तिसरी परिषद (UNCLOS-III) झाली आणि समुद्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्यांना मान्यता देण्यात आली.

यापैकी एक कायदा म्हणजे सी चा (समुद्राचा) कायदा, ज्याअंतर्गत एखाद्या देशाच्या नकाशात त्या देशाच्या बेस लाइनपासून 200 नॉटिकल मैलांपर्यंतची मर्यादा (GK Updates) दाखवणे बंधनकारक आहे. एक सागरी मैल 1.824 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीत 200 सागरी मैल म्हणजे 370 किलोमीटर.

त्यामुळेच भारताच्या समुद्राला लागून असलेल्या भारताच्या सीमेपासून 370 किलोमीटर अंतरावर येणारा परिसर नकाशात दाखवण्यात आला आहे. त्यामुळे स्वतंत्र देश असूनही भारताच्या नकाशात श्रीलंकेला नेहमीच पाहिले जाते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com