Plastic Technology : प्लास्टिक टेक्नॉलॉजीमध्ये असं करा करिअर; थेट कॅम्पसमधूनच होईल सिलेक्शन

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रोजच्या व्यवहारात प्लास्टिकचा वापर (Plastic Technology) दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक छोट्या मोठ्या व्यवसायात वेगवेगळ्या स्वरूपात प्लास्टिकचा  वापर हा होतोच. या प्लॅस्टिक निर्मिती व्यवसायात करिअर होवू शकतं; हे तुम्हाला माहीत आहे का? प्लास्टिक टेक्नॉलॉजीमध्ये B.Tech करून तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. बारावी झाल्यानंतर किंवा बारावीचा अभ्यास सुरु असताना तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो.

कॅम्पस सिलेक्शनची संधी (Plastic Technology)

या क्षेत्रात रोजगाराची कमतरता नाही. कॅम्पस सिलेक्शन मधूनच कंपन्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर करतात. बीटेक इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी हा चार वर्षांचा यूजी कोर्स आहे. बारावी (Plastic Technology) उत्तीर्ण झालेला कोणताही विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. अभ्यासक्रमात इंजिनीअरिंग ग्राफिक्स, मेकॅनिक्स, ऑरगॅनिक केमिस्ट्री, पॉलिमर नॅनोकॉम्पोसाइट्स, प्लास्टिक मटेरियल्स, पॉलिमरायझेशन आणि पॉलिमरचा गुणधर्म अशा महत्त्वाच्या विषयांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.

कोण करू शकतं अर्ज (Plastic Technology)

1. प्रत्येक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभियंता म्हणून तयार करण्याचा प्रयत्न करते. बारावी उत्तीर्ण झालेले किंवा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

2. बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) हे विषय असणं बंधनकारक आहे. 55-60 टक्के गुण मिळवल्यास (Plastic Technology) बारावीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मदत होते.

3. देशात अनेक खासगी संस्था आहेत, ज्या एकतर गुणवत्तेनुसार प्रवेश देतात किंवा त्यांची प्रवेश परीक्षा घेतात. सरकारी संस्था अनेकदा जेईई आणि काही राज्यांच्या माध्यमातून किंवा स्वत:च्या प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश घेतात.

कुठे घ्याल अॅडमिशन

सीआयपीईटी ही देशातील रायपूर, लखनौ, हाजीपूर, चेन्नई, भोपाळ, अहमदाबादसह अनेक सरकारी शैक्षणिक संस्था आहेत. खासगी कॉलेजपेक्षा फी खूपच कमी आहे. यापैकी एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. (Plastic Technology)

गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैदराबाद, युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र, आर्यभट्ट नॉलेज युनिव्हर्सिटी, बिहार यासारख्या संस्थांमध्येही प्रवेश घेऊन विद्यार्थी आपले भविष्य उज्ज्वल (Plastic Technology) करू शकतात.

हे कोर्सेस उपलब्ध

प्रवेश प्रक्रियेतून जात असाल, तेव्हा बीटेकमध्ये अनेक कोर्सेस दिसतील. उदाहरणार्थ, बहुतेक सीआयपीईटीमध्ये बीई-प्लास्टिक अभियांत्रिकी, बीई-मॅन्युफॅक्चरिंग (Plastic Technology) अभियांत्रिकीमध्ये यूजी अभ्यासक्रम आहेत. काही कारणास्तव प्रवेश शक्य नसला तरी निराश होऊ नका. या सर्व संस्थांमध्ये प्लास्टिक इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते साधारणत: दीड ते तीन वर्षांचे असतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com