करिअरनामा ऑनलाईन । 9 ते 5 ची नोकरी सोडून व्यवसाय सुरु करायची (Business Tips) अनेकांची इच्छा असते. मात्र व्यवसाय सुरु करणं हे सहज सोपं काम नाही. कोणताही व्यवसाय सुरु करायचं म्हंटलं की आपल्याकडे अनेक गोष्टी असाव्या लागतात. जर व्यवसायात यश मिळवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षकपणा. व्यवसायात यश मिळवायचं असेल तर तुम्ही एक Active आणि Smart बिझनेसमन असायला पाहिजे. पण तुमच्या अंगी पुढील काही गुण असतील तरच तुम्ही यशवी बिझनेसमन होवू शकता.
यशस्वी बिझनेसमन होण्यासाठी ‘या’ गोष्टी करा (Business Tips)
1. मार्केट रिसर्च करा (Business Tips)
लक्षात ठेवा…व्यवसाय सुरु करणारे तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या आधीही तुमच्यासारखेच असे अनेक व्यवसाय सुरु झाले आहेत. हे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे मार्केट रिसर्च करायला विसरू नका. त्यांनी ज्या चुका केल्यात त्या तुमच्याकडून होणार नाहीत याची काळजी घ्या.
2. संपर्क वाढवा
यशस्वी Businessman व्हायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या व्यवसायाशी निगडित ग्राहकांशी आणि डीलर्सशी संबंध वाढवणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला (Business Tips) यश मिळू शकेल. तसंच ग्राहकांशी उत्तम व्यवहार करणं, त्यांना उत्तम प्रोडक्ट देणं, तसंच फसवणूक न करणं महत्त्वाचं आहे.
3. आपल्या प्रोडक्टची मार्केट व्हॅल्यू तपासा
जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरु करायचा आहे; तर तुम्हाला त्या व्यवसायाची किंवा तुम्ही विकत असलेल्या प्रोडक्टची मार्केट व्हॅल्यू (Market Value) माहिती असणं (Business Tips) अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही विकत असलेली गोष्ट बाहेर कितीला विकली जातेय किंवा बाहेरच्या बाजारात उपलब्ध आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हे माहिती असेल तरच तुम्ही व्यवसायात चांगला जम बसवू शकता.
4. सपोर्ट ग्रुप तयार करा
आता व्यवसाय म्हंटलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल. व्यवसाय सुरु करताना अनेक गोष्टींमध्ये लाखो रुपये लागतात. नोकरी करणाऱ्या लोकांकडे (Business Tips) इतके पैसे नसतात. अशावेळी घाबरून जाऊ नका. आपले मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबीय यांच्या मदतीनं व्यवसाय सुरु करा. या लोकांना आपला सपोर्ट ग्रुप म्हणून सामील करून घ्या. अडचणीच्या वेळेला हे लोक नेहमी मदत करतील.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com