Indian Navy : आता महिलांना खलाशी पदावर मिळणार संधी; Indian Navy चा मोठा निर्णय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय संरक्षण दलाचा जगात 4 था क्रमांक लागतो. संरक्षण (Indian Navy) दलाचे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स असे तीन मुख्य प्रकार पडतात. भारतीय सैन्य दलांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचादेखील उल्लेखनीय सहभाग आहे. हा सहभाग आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय नौदलानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नौदल प्रथमच महिला खलाशांना सेवेत सामावून घेणार आहे. चीफ अॅडमिरल आर. हरिकुमार यांनी याबाबत माहिती दिली. भारतीय नौदल प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हजार अग्निवीर भारतीय नौदलात सामील होत आहेत. त्यापैकी 341 महिला आहेत. भारतीय नौदलात उपलब्ध पदांसाठी अर्ज केलेल्या 10 लाख व्यक्तींमध्ये 82 हजार महिला उमेदवार होत्या.

पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) पासिंग आउट परेडला संबोधित करण्यासाठी नौदल प्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं होतं. कारण, चीफ अॅडमिरल आर. हरिकुमार हे NDA खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. 1 जानेवारी 1983 रोजी ते भारतीय नौदलात रुजू झाले (Indian Navy) होते. पासिंग आउट परेडमध्ये बोलताना त्यांनी नौदलातील महिलांच्या समावेशाबद्दल माहिती दिली.

सैन्यदलांनी जेंडर न्यूट्रल व्हावं (Indian Navy)

सैन्यदलांनी जेंडर न्यूट्रल म्हणजेच सर्व लिंगांच्या व्यक्तींना समान संधी दिली पाहिजे, या गोष्टीवर नौदल प्रमुखांनी भर दिला. ते म्हणाले की, या पूर्वी भारतीय नौदलात फायटर (Indian Navy) पायलट पदावर आणि एअर ऑपरेटर पदावर महिला अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र खलाशी म्हणून त्यांना संधी दिली गेली नव्हती. आता महिला खलाशांचीही नौदलात भरती केली जात आहे. पुढच्या वर्षी नौदलातील उर्वरित सर्व शाखांमध्ये महिलांना प्रवेश दिला जाईल, असंही नौदल प्रमुख म्हणाले.

महिलांचा उदंड प्रतिसाद

नौदल प्रमुख म्हणाले, “अग्नीवीर भरतीमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. नौदलातील तीन हजार रिक्त पदांसाठी 10 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 82 हजार अर्ज महिलांचे होते. त्यापैकी कितीजणी सर्व मानकं पूर्ण करतील हे सांगता येत नाही. कारण, सध्या नौदलाकडे पुरुष आणि महिलांसाठी (Indian Navy) शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेसाठी वेगळी मानकं नाहीत. दोघांनाही सारख्या जबाबदारीच्या पदावर नोकरी मिळणार असल्यानं पात्रता निकष सारखेच ठेवण्यात आले आहेत.”

“देशासाठी मेड-इन-इंडिया सुरक्षा पर्याय तयार करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका कार्यान्वित होणं ही भारतासाठी एक ऐतिहासिक घटना होती. गेल्या वर्षभरात (Indian Navy) लष्करी कार्यप्रणालीच्या बाबतीत भारत अतिशय व्यस्त होता. गेल्या एका वर्षात भारतीय नौदलानं अतिशय उच्च दर्जाची ऑपरेशनल पातळी गाठली आहे,” असंही आर. हरिकुमार म्हणाले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com