करिअरनामा ऑनलाईन । मंदीच्या काळात अनेक जणांवर बेरोजगारीचं संकट (Unique Career Options) ओढवलं आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना घरी बसवत आहेत. अशात नवीन नोकरी मिळणंही अवघड झालंय. खरं तर तुम्ही मार्केटमधील मागणीनुसार जर शिक्षण घेतलं तर नोकरी मिळवणं इतकंही कठीण नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कोर्सबद्दल सांगणार आहोत. जर, तुम्हाला नाइटलाईफ आकर्षक वाटत असेल आणि तुम्हाला या दिशेने करिअर करायचं असेल, तर तुमच्यासाठी बारटेंडिंग हा एक उत्तम पर्याय आहे.
आवडीप्रमाणे करू शकता बारटेंडिंग
तुम्ही या फिल्डमध्ये पूर्ण वेळ नोकरी करावी, हे गरजेचं नाही. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये नोकरी न करता फ्रीलान्स कामदेखील करू शकता. पार्टी आणि इव्हेंट सर्किटसाठी काम (Unique Career Options) करण्याचा एक पर्यायदेखील आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे इव्हेंट निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट टीमसोबत काम करू शकता आणि अॅडव्हर्टायझिंगसह इतर गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकता.
असं असतं जॉब प्रोफाईल (Unique Career Options)
बार काउंटरच्या मागे काम करणं हे खूप ग्लॅमर असलेलं आणि मजेदार काम आहे. बारटेंडरला प्रामुख्याने कॉकटेल मिक्स करावी लागतात. वेब्हरेज मेनू बनवावा लागतो आणि ती ड्रिंक्स सर्व्ह करावी लागतात. फक्त ड्रिंक्स मिक्स करण्यापेक्षाही बारटेंडिंगमध्ये करण्यासारखं बरंच काही आहे. बारमध्ये आणि आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी बारटेंडर जबाबदार असतो. बारची स्वच्छता तपासण्यापासून ते स्टॉकमधील फळं, गार्निश, लिंबाचा रस आणि साखरेचा पाक तपासण्यासह सेल्स समरी तपासणं आणि बार टीमला कोणत्याही विशेष किंवा नवीन ऑफरबद्दल माहिती देणं, हेदेखील बारटेंडरचं काम आहे.
बारटेंडिंगसाठी कोर्सेस
बारटेंडिंगसाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. वाईन, बिअर, ड्रिंक्स मिक्सिंग, बिलिंग, प्रायझिंग, ब्रँड्स, बार एथिक्स, अल्कोहोल अवेअरनेस आणि लायसन्सिंगचा कायदा या सर्व गोष्टी अभ्यासक्रमांमध्ये शिकवल्या जातात. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमधून बीएससी (Unique Career Options) करू शकता किंवा कुलिनरी आर्ट्समधून बीए करू शकता. या शिवाय अनेक ठिकाणी प्रोफेशनल बारटेंडिंग आणि अॅडव्हान्स्ड बारटेंडिंगचे सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत. अनेक अभ्यासक्रम आता ऑनलाइनही उपलब्ध आहेत. तुम्हाला या क्षेत्राची आवड असेल तर बारटेंडिंग हा तुमच्यासाठी करिअर करण्यास एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com