करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने MPSC मार्फत (Talathi Bharti 2022) लिपिक आणि टंकलेख पदांची मेगा भरती करण्यासाठी नुकताच निर्णय घेतला होता. यानंतर आता राज्यातील 4 हजार 122 तलाठी आणि तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार असून त्यास राज्य मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील 06 विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती 15 दिवसात शासनास पाठविण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातारवण आहे.
राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी 29 नोव्हेंबरला स्वतंत्र पत्र काढून तलाठी संवर्गातील 31 डिसेंबर 2022 रोजी रिक्त होणारी 1012 पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे, असे एकूण 4122 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील विभागनिहाय रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील MPSC मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहीरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार असल्याने आयोगाकडे वेळेत माहिती पाठविण्याबाबत स्पष्ट आदेशही दिले आहेत.
कोणत्या विभागात किती पदे? (Talathi Bharti 2022)
- नाशिक – १०३५
- औरंगाबाद – ८७४
- कोकण – ७३१
- नागपूर – ५८०
- अमरावती – १८३
- पुणे – ७४६
नाशिमध्ये सार्वधिक १०३५ तर अमरावती विभागात १८३ जागा येत्या १५ दिवसांमध्ये माहिती देणे आहे बंधनकारक सर्वच माहिती विहीत नमुन्यात विवरण पत्रात भरुन जिल्हानिहाय प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त करुन १५ दिवसांत सादर करण्याचे आदेशही दिले आहे. त्यामुळे आता सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना वेळेत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांचे पदे ही रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे भरल्यास शासनाचे काम गतीमान होऊन शेतकरी तसेच नागरिकांचे (Talathi Bharti 2022) प्रश्नही यामुळे सुटणार आहेत. या निर्णयाचे आता सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
पद संख्या – 4122 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक.
वय मर्यादा –
सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
मागास प्रवर्ग: 19 ते 43
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
मिळणारे वेतन – दरमहा रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु. 2,400.
असं असेल परीक्षेचे स्वरूप –
मराठी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
इंग्रजी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
सामान्य ज्ञान – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
बौद्धिक चाचणी – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
एकूण – प्रश्नांची संख्या 100 आणि एकूण गुण 200
असा करा अर्ज –
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जदाराचे स्वतःचे gmail account असणे आवश्यक आहे.
अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल. (Talathi Bharti 2022)
सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची तारीख – लवकरच जाहीर होईल
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://rfd.maharashtra.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com