MPSC Success Story : तलाठी ते उप जिल्हाधिकारी… असा आहे मिनाज मुल्ला यांचा खडतर प्रवास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्येक उच्च शिक्षित तरुण (MPSC Success Story) पाहत असतो. असेच स्वप्न उराशी बाळगून त्याला सत्यात उतरवले आहेत सांगोला तालुक्यातील एखतपुर येथील मिनाज मुल्ला यांनी. शेतात काबाडकष्ट करुन MPSC परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने मिनाज मुल्ला उत्तीर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील दुसरे उपजिल्हाधिकारी होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे. वाचूया त्यांची प्रेरणादायी यशोगाथा…

दुष्काळी पट्ट्यातील रहिवासी 

उपजिल्हाधिकारी पदाचा बहुमान प्राप्त केलेल्या मिनाज मुल्ला यांचे दुष्काळी पट्ट्यातील सांगोला हे गाव. घरी आई-वडील दोघेही शेतकरी. मिनाज यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यांना कोरडवाहू चार एकर शेती होती. मोठ्या भावाचे सातवीपर्यंत तर बहिणीचे फक्त दहावीपर्यंत (MPSC Success Story) फक्त शिक्षण झलेले. अशा परिस्थितीत मिनाज यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.

‘मुलांनी खूप मोठं व्हावं’

त्यांनी शिक्षणासाठी शहरात येण्याचा विचार केला. शहरात मिनाज यांचे वडील सुरुवातीला टेलरिंग (शिवणकाम) काम करत असत. घरात शिक्षणाची कमतरता होती परंतु आई वडिलांची (MPSC Success Story) आपल्या मुलांनी खूप शिकाव व मोठं व्हावे ही इच्छा. त्यातून मिनाज यांनी सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल मधून दहावीत 83 टक्के गुण प्राप्त करत यश मिळवले. पुढे त्यांनी विद्यामंदिर प्रशालामधून बारावीचे शिक्षण चांगले मार्क मिळवून पूर्ण केले.

D. Ed. मध्ये ठरले अव्वल (MPSC Success Story)

मिनाज यांचा बारावीत मिळालेल्या मार्कांच्या जोरावर MBBS साठी शासकीय महाविद्यालयात नंबर लागला. परंतु घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी महाविद्यालयात प्रवेश न घेता D. Ed. करण्याचा निर्णय घेतला आणि एखतपुर (ता.सांगोला) येथुन त्यांनी D. Ed. चे शिक्षण पूर्ण केले. या ठिकाणी मिनाज यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत यश मिळवले.

शिक्षकाची नोकरी, घरची शेती सांभाळत MPSC ची तयारी 

मुल्ला यांनी इंग्लिश मधून BA चे प्रथम वर्गात शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे मिनाज यांनी आपले सर्व शिक्षण घरची शेती सांभाळत पुर्ण केले . घरची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी D. Ed. नंतर लगेच शिक्षकाची नोकरी पकडली. रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करून त्यांनी आपले डीएडचे शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांना मित्रांचे सहाय्य मिळाले.

तलाठी पदापासून शासकीय नोकरीला सुरुवात

विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास न लावला फक्त आई – वडिलांचा पाठिंबा, पत्नी शबाना आणि मित्रांच्या साहाय्याने मिनाज यांनी अनेक सरकारी पदाच्या परीक्षा दिल्या. त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला तलाठी पदाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते तलाठी झाले. त्यानंतर गट ‘ब’ साठी असलेल्या (MPSC Success Story) पोलीस उपनिरीक्षक पदाची त्यांनी परीक्षा दिली. मात्र, त्यांना मुलाखत देता आली नाही म्हणून त्यांनी हार मानली नाही. आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी राज्य सेवेचीही परीक्षा दिली आणि ते मुख्याधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी आपले पुढील प्रयत्न सुरु ठेवले आणि अखेर त्यांनी ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी परीक्षेत यश मिळवले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com