करिअरनामा ऑनलाईन । सरकारी अधिकारी होण्याची अनेक (Success Story) तरुण-तरुणींची इच्छा असते. MPSC परीक्षेत यश मिळवणीसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. यात काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काही विद्यार्थ्यांच्या पदरी निराश येते. पण परिस्थितीला कारण न बनविता सातत्यापूर्ण प्रयत्न केले तर यश मिळतंच. याचं एक उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावच्या शेतकरी कुटुंबातील मुलगी विद्या यांचं. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.
संपूर्ण राज्यात 6 वा क्रमांक
विद्या कांदे असं त्यांचं नाव आहे. त्यांनी फक्त स्पर्धा परीक्षाच पास केली नाही तर संपूर्ण राज्यात कर निरीक्षक म्हणून 6 वा क्रमांक पटकवला आहे. विद्याचं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या 2021 च्या (Success Story) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विद्याला 277.5 मार्क मिळाले आहेत. या गुणांसह विद्याने राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. 2021 साली विद्याने ही परीक्षा दिली होती. विद्याच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नोकरी करत केला अभ्यास (Success Story)
विद्याने सुरुवातीचे शिक्षण साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले. 10 वी नंतर 11 वी व 12 वी चे शिक्षण तिने परभणी येथील नवोदय विद्यालयत पूर्ण केले व सध्या ती साखरा येथे ग्रामीण डाक सेवक या पदावर कार्यरत आहे. ही नोकरी करत असताना त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. या मेहनतीचे फळ त्यांना मिळालेच. महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक पदावर त्यांची निवड झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मुलींमधून त्यांनी 6वा क्रमांक पटकावला आहे.
यशामध्ये भावाचा सिंहाचा वाटा
विद्या यांच्या यशामागे त्यांच्या भावाचा सिंहाचा वाटा आहे. विद्या लहान असतांना त्यांचे वडील मृत्यू पावले. आई ने काबड कष्ट करू मुलाबाळांना शिकवले मात्र जसे मुले मोठी (Success Story) होत गेली तसा शिक्षणाचा खर्च वाढत होता. विद्याचा भाऊ विकास कांदे यांनी स्वतःच्या शिक्षणावर होणार खर्च कमी करून आपल्या बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. राज्य कर निरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल विद्या यांचे सर्व स्तरावरुन कौतुक केले जात आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com