करिअरनामा ऑनलाईन। जागतिक मंदीचे परिणाम हळुहळू दिसू लागले आहेत. ट्विटर, मेटा (Secure Career) सारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. पुढील काही महिन्यांत अनेक कंपन्यांमध्ये असे चित्र दिसू शकते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअर केल्यानंतर अचानक कामावरुन काढून टाकले जाणे हे पचविणे फार कठीण असते. अशावेळी येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी करिअर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याची आपण माहिती घेऊया.
1. आपत्कालीन निधीची तरतूद करा
सहा महिने ते एक वर्षाचे उत्पन्न आपत्कालीन निधी म्हणून बाजूला ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला नोकरीत कपातीचा सामना करावा लागला तर, तुम्हाला दुसरी नोकरी मिळेपर्यंत पुढील काही महिने टिकून राहण्यासाठी तुम्ही किमान या पैशावर अवलंबून राहू शकता.
तुमच्या पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी असावी. लिक्विड फंड किंवा बचत खात्यात पैसे असल्यास गरजेवेळी उपयोगी येतील.
2. वैयक्तिक आरोग्य विमा घ्या (Secure Career)
कंपनीच्या आरोग्य विम्यावर पूर्णपणे विसंबून राहू नये आणि याचे एक प्रमुख कारण म्हणजे कामावरून काढून टाकले गेल्यास तुम्ही योजनेचे लाभार्थी नसता. त्यामुळे तुम्ही कामाच्या बाहेर असताना एमर्जन्सी उद्भवल्यास खिशातून बिल भरावे लागेल, ज्यामुळे तुमचा आर्थिक ताण वाढेल. म्हणून, स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी वैयक्तिक आरोग्य विमा घेणे नेहमीच उचित आहे.
3. बजेट तयार करा
आर्थिक संसाधने आधीच कमी असतात. त्यामुळे स्वत:च्या (Secure Career) खर्चावर बारकाईने लक्ष देणे आणि मासिक बजेटमध्ये सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. अन्न, वीज बिले, ईएमआय इ. या गोष्टी टाळता येत नाहीत. त्यामुळे त्यानुसार तुमचे मासिक खर्च ठरवा.
4. अनावश्यक खर्च कमी करा
मर्यादित उत्पन्न असताना तुम्ही नेहमी बचत करणे आवश्यक आहे. बाहेर खाणे, चित्रपट पाहणे, मासिकांची वर्गणी अशा मनोरंजनात्मक, ऐच्छिक खर्चांमध्ये कपात करता येऊ शकते. सध्या तुम्ही असे खर्च पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अचानक नोकरी गेल्यास बचत आणि गुंतवणूक कमी करता येऊ शकते.
5. कर्ज घेणे टाळा
वैयक्तिक कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे ही गोष्ट (Secure Career) टाळली पाहीजे. ही कर्जे अल्पावधीत पैशाच्या त्रासातून बाहेर पडण्याच्या तुलनेने सोपा मार्ग वाटू शकतात, परंतु त्यांचे व्याजदर खूप जास्त असतात. याचा पुढच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com