करिअरनामा ऑनलाईन। अनेक अडचणींचा सामना करत पुढे जातो तो शेतकरी वर्ग. आपण (Farmer Success Story) नेहमी पाहतो की अस्मानी संकटासमोर हार न मानता शेतकरी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आला आहे. कमकुवत आर्थिक पाठबळ आणि संसाधनांची कमतरता असून देखील या शेतकऱ्याने अत्यंत संयम दाखवत तरकारी पिकातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
साडेतीन एकरात पिकवली तरकारी
या शेतकऱ्याच्या मालकीची अवघी साडेतीन एकर जमीन आहे. या जमिनीवर तरकारीची विविध पिके घेत या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांची जमीन देखील (Farmer Success Story) कसायला घेतली आहे. त्या जमिनीवर ते वर्षभर कोथिंबिरीचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मुरूममधील बबलू बाळासाहेब देशमुख यांची ख्याती आता सर्व जिल्हाभर पसरली आहे.
22 वर्षांपासून घेत आहेत कोथिंबिरीचे उत्पादन (Farmer Success Story)
मुरूममधील बबलू बाळासाहेब देशमुख हे गेल्या 20 ते 22 वर्षांपासून कोथिंबिरीचे उत्पादन घेत आहेत. मुरूम हे पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. बबलू शेती करत असतानाच इतर शेतकऱ्यांकडून कोथिंबीर घेऊन पुणे, चिपळूणसह इस्लामपूरमधील बाजारात विक्री करत आहेत. तसेच स्वतःच्या शेतीसह इतरांची शेती कसायला घेत त्यातून सुद्धा ते चांगले उत्पन्न घेत आहेत.
जेवढी मागणी तेवढा पुरवठा
बाबलू यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातील बाराही महिने कोथिंबिरीचे उत्पादन घेण्यात त्यांचा असलेला हातखंडा. यामुळेच त्यांच्याकडे कोथिंबिरीची मागणी (Farmer Success Story) केल्यास 24 तासांत आवश्यक तेवढा पुरवठा करण्यास ते सक्षम असतात. हा व्यवसाय करताना राजेंद्र सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि साथ लाभल्याचे बबलू देशमुख आवर्जून सांगतात.
निसर्गाचा लहरीपणा सोसावा लागतो
शेतकऱ्यांकडून ते एकरी 12 ते 13 हजार रुपये प्रमाणे शेती कसायला घेतात. विविध शेतकऱ्यांची मिळून जवळपास ७० ते ८० एकर जमीन त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. शेती भाड्याने घेताना त्यांना अनेकवेळा मोठी जोखीम देखील पत्करावी लागते. निसर्गाच्या लहरीपणामुळे बऱ्याचवेळा मोठ्या प्रमाणात नुकसानही सहन करावे लागते. मात्र याचवेळी त्यांचा गेल्या 20 ते 22 वर्षांचा अनुभव कामी येत असल्याचे बबलू देशमुख आवर्जुन सांगतात.
असे मिळते उत्पन्न
कोथिंबिरीच्या व्यवसायामध्ये अनेकवेळा नुकसान होते. मात्र वर्षातून दोन ते तीनवेळा या व्यवसायात चांगला बाजारभाव मिळत असल्याने नुकसान भरून निघते. एकरी 10 ते 12 हजार गड्ड्यांचे उत्पादन मिळते. कोथिंबिरीचे पीक येण्यास सुमारे 40 दिवसांचा कालावधी लागतो. बाजारभाव मिळाल्यास (Farmer Success Story) एकरी 15 ते 40 हजार रुपये उत्पन्न मिळते. देशमुख हे स्वतःच्या शेतीमध्ये कोथिंबीर, मका, मेथी अशी उत्पादने घेतात. सुरुवातीच्या काळात हा व्यवसाय करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले मात्र, सद्य:स्थितीत त्यांचा या व्यवसायात चांगलाच जम बसला आहे.
या व्यवसायाच्या दररोजच्या व्यवस्थापनासाठी जवळपास 20 ते 25 कामगार लागतात. पावसाळ्यात पावसामुळे कोथिंबिरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, मात्र पावसातून जे पीक सहीसलामत बाहेर पडते त्याला अत्यंत चांगला बाजारभाव मिळत असल्याचे ते सांगतात.
गुणवत्ता आणि विश्वासार्हता टिकवण्याचे ध्येय
येणाऱ्या काळात आपल्याला कोथिंबिरीच्या शेतीमध्ये वाढ करता नाही आली तरी चालेल मात्र, गुणवत्ता आणि विश्वासार्हता जपणे हेच आपले मोठे दायित्व असून ते पेलवायचे असल्याचे (Farmer Success Story) बबलू देशमुख सांगतात. तसेच, या व्यवसायात पत्नीची आणि संपूर्ण कुटुंबाची आपल्याला मोलाची साथ मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com