करिअरनामा ऑनलाईन। स्वच्छता करणं हा स्त्रियांचा मुळ स्वभाव. घराची (Auri Katarina) साफसफाई करणं कोणाला नाही आवडत? पण हेच घर दुसऱ्याचं असेल तर कदाचित आपल्याला आवडणार नाही. पण आता असे खूप कमी लोक असतील ज्यांना घर जास्त स्वच्छ करायला आवडेल. पण एक महिला आहे जिला घर साफ करणे इतके आवडते की तिने ते आपले स्वप्न बनवले आहे. वास्तविक, ऑरी कॅटरिना नावाच्या महिलेने आपली नोकरी सोडली आणि आता ती लोकांची घरे साफ करत जगभर फिरत आहे.
लोकांची गलीच्छ घरे स्वच्छ करते
29 वर्षीय ऑरी कॅटरिना हिने 2021 च्या उन्हाळ्यात तिच्या क्लिनिंग कंपनीत सर्व्हिस मॅनेजरची नोकरी सोडली. आता ती जगभर फिरते आणि लोकांना त्यांची गलिच्छ घरे स्वच्छ करण्यात मदत करते.
खरं तर, ऑरीने एका त्रासलेल्या आईला घर साफ (Auri Katarina) करण्यात मदत केली होती. तेव्हापासून ती स्वच्छतेच्या प्रेमात पडली. यादरम्यान तिला अनेक महिने पैसेही मिळाले नाहीत. मात्र, त्यादरम्यान तिने टिकटॉकवर तिचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली.
हळूहळू ऑरीचा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला आणि ती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टार झाली. यामुळे आता त्यांना प्रायोजक मिळतात आणि त्यामुळे त्यांचा खर्च भागतो.
परदेशात जावून करते सफाईची कामे (Auri Katarina)
प्रायोजकाकडून मिळणाऱ्या पैशातून ती जगभर फिरते आणि लोकांची घरे साफ करते. कोणाचेही घर स्वच्छ करण्यासाठी ती एक पैसाही घेत नाही. ऑरी कॅटरिना ही फिनलंडची आहे. पण तीने अमेरिकेतून ब्रिटनमध्ये जाऊन लोकांची घरे स्वच्छ केली आहेत. टिकटॉकवर तिचे 78 लाख फॉलोअर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर 20 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com