करिअरनामा ऑनलाईन। ‘अग्निवीर’ भरती झाल्यानंतर अग्निविरांना बँकिंग सुविधा देण्यासाठी (Agnipath Yojana) भारतीय लष्कराने 11 बँकांशी सामंजस्य करार केले आहेत. संरक्षण मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. या वर्षी जूनमध्ये सरकारने तीन सेवांसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत, 17 ते 21 वयोगटातील तरुणांना केवळ 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल, त्यापैकी 25 टक्के नियमित सेवेसाठी निवडले जातील.
‘या’ बँकांशी केला करार – (Agnipath Yojana)
1. स्टेट बँक ऑफ इंडिया,
पंजाब नॅशनल बँक,
3. बँक ऑफ बडोदा,
4. आयडीबीआय बँक,
5. आयसीआयसीआय बँक,
6. एचडीएफसी बँक,
7. अॅक्सिस बँक,
8. येस बँक,
9. कोटक महिंद्रा
10. IDFC फर्स्ट बँक
11. बंधन बँक
अग्निवीरांच्या नोंदणीनंतर भारतीय लष्कर ‘अग्निवीरांना या बँकांच्या माध्यमातून बँकिंग सुविधा देणार आहे. या 11 बँकांसोबत ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली.
पहिल्या बॅचचे प्रशिक्षण जानेवारीपासून सुरू –
या सुरू करत आहेत. ‘अग्निवीर’ची पहिली तुकडी पुढच्या (Agnipath Yojana) वर्षी जानेवारीपर्यंत लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात रुजू होईल.
भरतीसाठी महिलांचा प्रतिसाद लक्षणीय –
अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्याच्या कोअर ऑफ मिलिटरी पोलीस म्हणजेच CMP विभागात रिक्त असलेल्या 100 जागांवर भरतीसाठी जवळपास अडीच लाख तरुणींनी अर्ज केले आहेत. सध्या सीएमपी ही सैन्यातील अशी एकमेव शाखा आहे जिथं अधिकारी रँक खालील पदांवर महिलांची भरती केली जाते. जमाव नियंत्रित (Agnipath Yojana) करणं, तपास, घुसखोरीविरोधी कारवाई, सण समारंभांतील बंदोबस्त अशा ठिकाणी महिला मिलिटरी पोलीस दलांतील कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली जाते. दरम्यान, अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरतीची प्रक्रिया आधीप्रमाणेच असून, या प्रक्रियेला मिळणार प्रतिसादही उत्साह वाढवणारा आहे. अग्निपथ योजनेचे निकष व अटी पूर्वीप्रमाणे कायम असल्याचं या भरती प्रक्रियेची जाण असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com