करिअरनामा ऑनलाईन। आजकाल जॉब शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज भासत नाही. जॉब (Career News) शोधण्यासाठी फोन किंवा लॅपटॉपवरून अप्लिकेशन पाठवण्याची सुविधा असते. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्यावरून तुम्हाला ज्या फिल्डमध्ये जॉब हवा आहे तसा जॉब मिळू शकतो. मात्र जिथे सुविधा आली तिथे त्या सुविधांचा गैरफायदा उचलणारे लोक आलेच. अशाच काही FAKE जॉबसाइट्स बनवून तरुणांची आणि बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एका वेबसाईट्सचा पर्दाफाश झाला आहे. सरकारनं या वेबसाइट्संबंधी सावधान राहण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या संपूर्ण शिक्षा अभियानाच्या अधिकृत वेबसाइटच्या नावाने बनावट वेबसाइट चालवली जात आहे. या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या पोस्टवर सरकारी नोकरी मिळवून देण्याचा दावा केला जात आहे. समग्र शिक्षा या वेबसाईटच्या नावाखाली ही बनावट वेबसाईट लोकांची दिशाभूल (Career News) करण्याचे काम करत आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) ही माहिती दिली आहे. PIB ने सांगितले की samagrashiksha.org नावाची एक बनावट वेबसाइट समग्र शिक्षा अभियान बनून नोकऱ्या मिळवण्याचा दावा करत आहे.
या वेबसाइटचा भारत सरकारशी काहीही संबंध नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे. योग्य माहितीसाठी, लोक संपूर्ण शिक्षा अभियानाच्या अधिकृत वेबसाइट samagra.education.gov.in ला भेट देऊ शकतात. पीआयबीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. या संदर्भात एक फोटोही शेअर केला आहे.
वास्तविक, या बनावट वेबसाइटला भेट दिल्यावर, येथे नोकरीच्या रिक्त जागांचा तपशील दिला जात असल्याची माहिती आहे. शिक्षक भरती ते Answer Key अशी माहिती (Career News) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेबसाइटवर लाखो नोकऱ्या रिक्त असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत लोकांनी या वेबसाइटद्वारे कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी अर्ज करू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे समग्र शिक्षा अभियान?
खरं तर, केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मध्ये, प्री-नर्सरी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शिक्षणाची विभागणी न करता संपूर्णपणे विचार करण्याचा प्रस्ताव होता. या अंतर्गत, समग्र शिक्षा अभियान सुरू करण्यात आले, ज्याचा उद्देश प्री-स्कूल ते इयत्ता 12 वी पर्यंत शालेय शिक्षण तयार करणे हा होता.
A #Fake website, 'https://t.co/jkpggN6Inv' posing as the official website of the Samagra Shiksha Abhiyan is claiming to provide jobs for various posts.#PIBFactCheck
▶️This website is not associated with the Govt. of India
▶️For authentic info, visit: https://t.co/pCjN1ZGIMW pic.twitter.com/f4e9UuUtUR
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 8, 2022
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com