करिअरनामा ऑनलाईन। जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था (Indian Economy) होण्याच्या दृष्टीने भारत पाऊल (Job News) टाकत आहे. त्यामुळे भारतात नोकरीची लाट येणार आहे. पण त्यासाठी तुमची तयारी कितपत झाली आहे. यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत तयारीत रहा; हातची संधी हुकायला नको…
कंपन्यांमध्ये सुरु आहे रस्सीखेच
सध्या नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांना चिंता सतावत आहेत. त्यातच या कंपन्यांनी अनोख्या पद्धतीने, विशेष पॅकेज देण्याची तयारी सुरु केली आहे. नवीन टॅंलेंट आपल्याकडे खेचण्यासाठी या कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाखो कर्मचाऱ्यांची गरज भासणार (Job News)
अस्थायी कर्मचाऱ्यांचे तर नशीब उघडणर आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. इकोनॉमिक्स टाईम्सच्या एका अहवालानुसार 5,00,000 ते 6,00,000 कर्मचाऱ्यांची गरज पडणार आहे.
‘या’ कंपन्या तरुणांच्या शोधात
कुशल मनुष्यबळ पुरवणाऱ्या क्वेस, टीमलीज सर्विसेज, सिएल एचआर सर्व्हिसेस, मॅनपावर, रँडस्टँड आणि पर्सोलकेली या सारख्या कंपन्यांनी तरुणांना नोकरी देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या कंपन्यांनी (Job News) तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु केला आहे.
कंपन्या तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी ई-मेल, सोशल मीडियाचा खुबीने वापर करत आहे. सुरक्षा रक्षक, दिव्यांग, बसचे वाहक, रिक्षा चालक यांच्या मदत घेतली जात आहे. कंपन्यांनी कुठल्याही प्रकारे तरुणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
भरघोस पगारासह देणार इंसेंटिव्ह आणि बोनस
कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याने कंपन्यांनी ही पॅकेज वाढवून दिले आहे. कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांसाठी 30 टक्के पगार वाढीची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर कंपन्या या नवीन कर्मचाऱ्यांना (Job News) इंसेंटिव्ह आणि बोनसही देणार आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com