Success Story : लेकीनं करून दाखवलंच!! न्यायाधीशांच्या गाडीवरील ड्रायव्हरची मुलगी बनली न्यायाधीश
करिअरनामा ऑनलाईन। अनेकजण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी होतात. मोठी स्वप्नं डोळ्यासमोर (Success Story) ठेवून जिद्दीने प्रयत्न करत असतात. या लोकांच्या यशोगाथा इतरांसाठीही प्रेरणादायी असतात. अशाच प्रकारे नीमचच्या वंशिकानेही तिचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. वंशिका गुप्ता दिवाणी न्यायाधीश वर्ग-2 च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन नीमच कोर्टात न्यायाधीश बनली आहे. विशेष म्हणजे तिचे वडील दिवाणी न्यायाधीशांच्या गाडीचे चालक आहेत आणि आजोबा दिवाणी न्यायालयात कारकून होते; ही बाब उल्लेखनीय आहे. न्यायाधीशांच्या गाडीच्या चालकाची मुलगी स्वकर्तृत्वावर न्यायाधीश बनल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
मध्य प्रदेशमधील निमच येथील अरविंद गुप्ता यांची वंशिका ही कन्या. अरविंद गुप्ता न्यायाधीशांच्या गाडीचे चालक आहेत. उच्च न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश वर्ग-2 चा निकाल (Success Story) वांशिकाला सुखावून गेला. वंशीका परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश झाली आहे. या निकालाने वंशिकाच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली आहे.
सर्व श्रेय आई-वडिलांचे
राज्यभरातील न्यायालयांमधील रिक्त असलेल्या 252 जागांसाठी देशभरातील 350 उमेदवार लेखी परीक्षेला बसले होते. वंशिकाने संपूर्ण राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे. वंशिकाने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांची प्रेरणा, मेहनत आणि त्यांच्या समर्पणाला दिलं आहे.
आजोबा न्यायालयाचे निवृत्त कारकून (Success Story)
वंशिका गुप्ता यांचे आजोबा रमेशचंद गुप्ता हे देखील कोर्टात ग्रेड-1 रीडर होते. सेवानिवृत्ती नंतर सध्या ते मंदसौरमध्ये कायद्याची प्रॅक्टिस करत आहेत. तिचे वडील अरविंद गुप्ता हे सध्या जिल्हा न्यायालयात अल्प पगारावर ड्रॉयव्हर पदावर काम करत आहेत. त्याचबरोबर वंशिकाची आई शाळेत शिक्षिका आहे.
वंशिकाची आई सांगते
वंशिका लहानपणापासून घरात कोर्टातील चर्चा ऐकत आली आहे. याच वातावरणात ती लहानाची मोठी झाली. तिने लहानपणापासून तिच्या वडिलांना कष्ट करताना पहिले आहे. त्यावेळीच तिनं मोठ्या (Success Story) पदावर काम करण्याची इच्छा बाळगली. लहानपणापासूनच तिला न्यायाधीश बनण्याची इच्छा होती. तिचे वडील तिला नेहमी सांगायचे की, ‘मुली तू असं काम केलं पाहिजेस, ज्यामुळे माझी ओळख अजून मोठी होईल.’ वंशिकाने तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर तिच्या वडिलांची इच्छा पूर्ण केली आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com