करिअरनामा ऑनलाईन। आजच्या व्यावहारिक जीवनात इंग्रजी भाषा येणे खूप आवश्यक झाले आहे. मराठी (English Speaking) हि आपल्या ओठाची भाषा असली तरी इंग्रजी हि पोटाची भाषा झाली आहे. नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू देत असताना मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. तसेच मोठ-मोठ्या कंपन्या त्यांच्या ऑफिसमध्ये इंग्रजी भाषेलाच जास्त महत्व देताना दिसतात. मग आपल्याला जर त्यांच्यामध्ये टिकून राहायचे असेल तर आपल्याला सुद्धा इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. आपल्याला भविष्यात इंग्रजी भाषा कुठे आणि कशी उपयोगी येईल हे सांगू शकत नाही.
इंग्रजी भाषा समजते पण बोलायला कठीण जाते तर वाचा ह्या टिप्स -:
1. शब्दांच्या सोबत वाक्य हि शिका – Learn Sentences with Word
जेव्हा आपण नवीन शब्द शिकायचे प्रयत्न कराल तेव्हा त्या शब्दांना कोणत्या वाक्यामध्ये आपल्याला वापरता येतील, हे पण शिकून घ्या, म्हणजे जेव्हा आपण एखाद्याशी इंग्रजीमध्ये बोलू तेव्हा त्या वाक्यांचा उपयोग होईल. ज्या शब्दांना (English Speaking) किंवा वाक्यांना आपण दैनंदिन जीवनात शिकाल त्या शब्दांना आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहायला विसरू नका.
2. आत्मविश्वासाने बोला – Speak Confidently
सुरुवातीला इंग्रजी शिकल्यानंतर आपण विचार करतो कि, आपल्याला बोलता येईल कि नाही तर त्या गोष्टीची भीती आपल्या मनामध्ये मुळीच ठेवू नका, आणि बिनधास्तपणे आपल्याला जे बोलता येईल ते बोला, असाच सराव करत राहिल्याने आपल्याला हळू हळू इंग्रजी बोलायला मदत होईल. बोलताना आपला आत्मविश्वास हा नेहमी जास्त ठेवा, जेणेकरून समोरच्यावर आपला चांगला प्रभाव पडेल. म्हणून आत्मविश्वासाने आपल्या गोष्टी समोरच्या व्यक्तीसमोर मांडा.
3. इंग्रजी वर्तमानपत्रे वाचा – Read Newspaper (English Speaking)
इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी आपण दररोज इंग्रजी वर्तमानपत्रे वाचू शकता. त्यामधून आपल्याला दररोज नव-नवीन शब्द वाचायला मिळतील, आणि त्यामुळे आपला शब्द साठा वाढायला मदत होईल, तसेच वर्तमानपत्रामधील भाषा हि समजण्यासाठी खूप सोपी असते, तर आपण त्या गोष्टीचा फायदा घेत, आपल्या इंग्रजीला आणखी सुधारू शकता. वाचनामुळे आपल्या शब्दसाठ्यात आणखी भर पडेल.
4. इंग्रजी ऑडीओ बुक ऐका – Listen English Audio
नवीन भाषा शिकायला जास्त वेळ लागत नाही, जर त्या भाषेला शिकण्यासाठी आपली इच्छा हि प्रबल असेल तर, इंटरनेटवर बरेच असे ऑडीओ बुक उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून आपण आपली इंग्रजी भाषा चांगली सुधारू शकता.
5. इंग्लिश स्पिकिंग क्लास ज्वोईन करा – Join English Speaking class
आपल्याला जर मुळीच इंग्रजी बोलता येत नसेल तर आपण व्यावहारिक भाषा शिकण्यासाठी इंग्लिश स्पिकिंग क्लासचा सहारा घेऊ शकता. इंग्लिश स्पिकिंग क्लास जॉईन करून आपण आपल्या इंग्रजी भाषेला (English Speaking) आणखी चांगले बनवू शकता, तेथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे इंग्रजी भाषा शिकवली जाईल आणि जवळ जवळ दोन महिन्यात आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकाल. म्हणून शिकण्यासाठी उशीर न करता आपण लवकरात लवकर इंग्लिश स्पिकिंग क्लास जॉईन करा.
6. आजूबाजूला इंग्रजी वातावरण बनवा – Make The English Atmosphere Around You
आपण जर ऑफिसमध्ये कामाला असाल तर आपल्या ऑफिस चे वातावरण म्हणजेच तेथील सर्वांशी इंग्रजी भाषेत बोला, तसेच आपण विध्यार्थी असाल तर आपल्या मित्रांना सांगून ठेवा कि, मी इंग्रजीमध्ये बोलणार कारण मला इंग्रजी शिकायची आहे. तसेच आपल्या घरातील व्यक्तींशी थोड्या प्रमाणात इंग्लिश बोलायचे प्रयत्न करा. जेणेकरून आपल्या आजूबाजूला इंग्रजी भाषेचे वातावरण बनेल.
7. ऐकून घ्या आणि नंतर बोला – Listen First And Then Speak
आपल्याला माहीतच असेल एक चांगला श्रोताच चांगला वक्ता बनू शकतो, त्यासाठी आपण सर्वात आधी समोरच्याला पूर्णपणे ऐकून घ्या, त्यानंतर थोडा वेळ मनामध्ये विराम घेऊन त्यानंतर आपण आपले मत मांडा आणि समोरच्याशी बोला. या गोष्टीचा आपल्याला आणखी फायदा होईल. जर आपल्याला समोरच्या व्यक्तीचे उच्चार आणि वाक्य कळले नाही तर त्यांना आपण नम्रपणे माफी मागून ते काय बोलले हे पुन्हा विचारावे आणि नंतर आपले बोलणे सुरु ठेवावे.
8 . सुरुवातीला व्याकरणाकडे लक्ष देऊ नका – Ignore Initially Grammar Mistakes
जेव्हा आपण इंग्रजी बोलायची सुरुवात करू, तेव्हा बोलताना बऱ्याच चुका होतील. चुका कोणत्या, तर त्या व्याकरणाच्या. तर सुरुवातीला व्याकरणाकडे एवढे लक्ष न देता आपण आपल्या बोलण्यावर लक्ष द्यावे आणि आत्मविश्वासाने आपण बोलायला सुरुवात करा, काही काळाने आपोआप आपल्या बोलण्यात व्याकरण येऊन जाईल. म्हणून व्याकरणाची चिंता न करता, आपण फक्त आपल्या भाषेवर लक्ष द्या.
9. इंग्लिश सिनेमा पाहण्यावर भर द्या – Watch English Movie
कोणत्याही सिनेमातील डायलॉग सुद्धा आपल्याला लगेच पाठ होऊन जातात. या जगात वेगवेगळ्या प्रकारची लोकं आहेत. त्यांचा मेंदू हा वेगवेगळ्या प्रकारे शिकत असतो. काही लोक असे असतात जे एखाद्या गोष्टीला ऐकुन शिकून जातात, तर काही व्हिडिओच्या माध्यमातून शिकतात.
आपण कोणत्या गटात बसता? आपला मेंदू ऐकून लवकर शिकत असेल तर आपण ऑडिओ ऐकून शिकू शकता. तसेच आपण जर विडीवो पाहून लवकर शिकत असाल तर इंग्लिश मूवी आपल्यासाठी (English Speaking) कधीही योग्य राहील कारण त्यामध्ये आपल्याला शब्दांचे उच्चार तसेच त्यांना कशा प्रकारे बोलल्या जाते हे आपल्याला शिकायला मिळेल. म्हणून इंग्लिश मूवी पाहण्यावर भर द्या.
10. आनंद घेऊन शिका – Learn To Enjoy
कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी वेळ तर लागतोच म्हणून कोणत्याही प्रकारचा तान न घेता, आपण इंग्रजी भाषा शिका. आपण ताण न घेता जर शिकलात तर आपण लवकर इंग्रजी भाषा शिकाल, त्यानंतर आपण कुठेही आणि कसेही इंग्रजी बोलू शकाल आणि भविष्यात आपल्याला या गोष्टीची खूप मदत होईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com